आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:बाजारात तेजी; 9 महिन्यांनंतर सेन्सेक्स 61,000 पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परकीय बाजारात मजबूत आर्थिक आकडेवारी आल्याने देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली. सेन्सेक्स ३७५ अंकांच्या वाढीसह ६१,१२१ वर बंद झाला. तो नऊ महिन्यांत प्रथमच ६१,००० च्या वर बंद झाला. यापूर्वी १७ जानेवारी रोजी तो ६१,३०८.९१ वर बंद झाला होता. त्याचवेळी निफ्टी १३३ अंकांनी वधारला. तो १८,१४५.४० वर बंद झाला. अमेरिकी डॉलरच्या रुपएची विनिमय दरातील सुधारणा आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी यामुळेही बाजाराला आधार मिळाला. एनएसडीसीच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ४७९७.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...