आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेटा’ला फटका:मार्केट कॅप उसळल्याने अदानी अंबानींच्याही पुढे, मात्र नफा व उत्पन्नात अंबानीच सरस, झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत घट

न्यूयॉर्क, नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेटा या फेसबुकच्या पॅरेंट कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी झालेल्या प्रचंड घसरणीमुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग संपत्तीच्या बाबतीत भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा मागे पडले आहेत. दुसरीकडे, फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या रिअल टाइम यादीनुसार, अदानीही अंबानींना मागे टाकून सर्वात श्रीमंत भारतीय झाले आहेत. तथापि, अदानी यांची एकही कंपनी उत्पन्न, नफा किंवा कर भरण्याच्या बाबतीत अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आसपासही नाही. देशातील टॉप-२० कंपन्यांतही अदानी समूहाची कुठलीही कंपनी नाही. वर्ष २०२१ च्या आकड्यांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज उत्पन्न, नफा आणि कर देण्याच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानी आहे. अदानींची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेस उलाढालीत ३७ व्या स्थानी आहे. समूहाची अदानी पोर्ट अँड एसईझेड करपश्चात नफ्याच्या बाबतीत ३० व्या स्थानी आहे. समूहाच्या एकूण सहा लिस्टेड कंपन्यांपैकी इतर सर्व कंपन्याही उत्पन्न आणि नफ्याच्या बाबतीत खालच्या स्थानी आहेत.

अॅपल, गुगलमुळे फेसबुकला झटका
- अॅपलने लाँच केलेल्या प्रायव्हसी सेटिंग फीचरमुळे जाहिरातींनी ट्रॅक करावे की नाही याची निवड अॅपल युजर करू शकतात. बहुतेकांनी ट्रॅकिंगला ब्लॉक केले.
- गुगलने ब्राउजर क्रोमसाठी जाहिराती दाखवण्यासाठी ट्रॅकिंग मेकॅनिझम टॉपिक्सचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे जाहिरात कंपन्या युजरला ट्रॅक करू शकणार नाहीत. त्यामुळेही फेसबुकला झटका बसला आहे.

फेसबुकने भारतावर फोडले खापर
स्टॅटिस्टा या मार्केट रिसर्च फर्मनुसार, फेसबुकचे भारतात ३५ कोटी युजर आहेत. तथापि, देशातही तिचे युजर घटले आहेत. फेसबुकचे सीएफओ डेव्हा वेह्नर यांनी त्याचे खापर भारतीय टेलिकॉम कंपन्यांवर फोडत म्हटले, ‘भारतात डेटाचे दर वाढल्याने आमचे सक्रिय युजर घटले आहेत.’ फेसबुकचे जगात प्रथमच रोजचे सक्रिय युजर १० लाखांनी घटून १९२.९ कोटी झाले.

झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत ऐतिहासिक घसरण, पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या टॉप-१० यादीतून बाहेर
फोर्ब्जनुसार, अव्वल अब्जाधीशांत ६.८१ लाख कोटी रु. संपत्तीसह अदानी १० व्या आणि अंबानी ६.६९ लाख कोटी रु. च्या संपत्तीसह ११ व्या स्थानी. झुकेरबर्ग ६.३६ लाख कोटी रु. सह १२ व्या स्थानी.

बातम्या आणखी आहेत...