आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन हायड्रोजन डील:अदानीच्या ग्रीन हायड्रोजन कंपनीतील 25% भागिदारी खरेदी करणार टोटल एनर्जी, घोषणेनंतर शेअरमध्ये तेजी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच कंपनी TotalEnergies आणि Adani New Industries Limited (ANIL) जगातील सर्वात मोठी ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम तयार करणार आहेत. यासाठी फ्रेंच कंपनी ANIL मधील 25% भागिदारी खरेदी करणार आहे. टोटल एनर्जी जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू उत्पादकांपैकी एक आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडमध्ये टोटल एनर्जीकडे आधीच 37.4% भागिदारी आहे.

अदानी न्यू इंडस्ट्रीजचे पुढील 10 वर्षांमध्ये ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टममध्ये 50 अब्ज डॉलर (रु. 3.9 लाख कोटी) गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी 2030 पर्यंत दरवर्षी 1 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करेल. या घोषणेनंतर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये सुमारे 3% वाढ दिसून आली.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, "जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादक बनण्याच्या आमच्या प्रवासात, Total Energies सोबतची भागीदारी संशोधन आणि विकास, बाजारपेठेतील पोहोच आणि ग्राहकांची पुढील समज यासह अनेक आयामांना जोडते."

मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढेल

टोटल एनर्जीचे CEO आणि अध्यक्ष पॅट्रिक पोयने म्हणाले की, “ANIL सोबतची भागीदारी ही आमची नूतनीकरणयोग्य आणि कमी कार्बन हायड्रोजन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे, जिथे आम्ही 2030 पर्यंत युरोपियन रिफायनरीजमध्ये वापरल्या जाणार्‍या हायड्रोजनचे डीकार्बोनाइज (कार्बन उत्सर्जन कमी) करू शकतो. यासह, मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन वाढविले जाईल.

अदानी समूह आणि टोटल एनर्जीज यांच्यातील भागीदारीमध्ये आता एलएनजी टर्मिनल्स, गॅस युटिलिटी व्यवसाय, अक्षय व्यवसाय आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन यांचा समावेश आहे.

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत आहे. पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करून हायड्रोजन तयार होतो. या प्रक्रियेत अक्षय ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे त्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...