आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Business
 • Markets Will Overcome Financial Crisis; One Lac Crore Package For Banks, Financing By The Reserve Bank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:बाजारपेठा आर्थिक संकटावर करतील मात; रिझर्व्ह बँकेकडून बँका, वित्तसंस्थांसाठी एक लाख कोटींचे पॅकेज 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ०.२५% घटवून ३.७५% केला, यामुळे बँकांकडे रोकड वाढेल
 • ९० ऐवजी १८० दिवसांत मासिक हप्ता भरला नाही तरी कर्ज थकीत होणार नाही

लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेल्या अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी ६ मोठ्या घोषणा केल्या. बँका, बँकेतर वित्तपुर‌वठा संस्था (एनबीएफसी), वित्त संस्थांशी संबंधित या घोषणांचा उद्देश सर्वसामान्यांना, उद्योजकांना सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होऊन बाजारात रोकडतेचे प्रमाण वाढावे असा आहे. बँकांकडे कर्ज देण्यासाठी रोख रक्कम वाढवण्यासाठी आरबीआयने रिव्हर्स रेपो दर ०.२५% ने घटवून ३.७५%  केला आहे. बँका आणि वित्त संस्थांसाठी एक लाख कोटी रुपयांचेही पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण आणि कृषी क्षेत्रासह रिअल इस्टेट क्षेत्राला मदत होईल. लॉकडाऊननंतर आरबीआयने दुसऱ्यांदा अनपेक्षित घोषणा केल्या आहेत. यापूर्वी २७ मार्चला रेपो रेट आणि कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये कपातीसह कर्जाचे हप्ते तीन महिन्यांसाठी न भरण्याची सवलत दिली होती. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, २७ मार्चनंतर  आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. 

असा समजून घ्या रिझर्व्ह बँकेच्या घोषणांचा तुमच्यावर होणारा परिणाम

1 वित्त संस्थांना पॅकेज : नाबार्डला २५ हजार कोटी, नॅशनल हाउसिंग बँकेला (एनएचबी) १० हजार कोटी आणि भारतीय लघुउद्योग विकास बँकेला (सिडबी) १५ हजार कोटी रुपये मिळणार. लाँग टर्म रेपो प्रक्रियेद्वारे आणखी ५० हजार कोटी रुपये मिळणार.  परिणाम : ग्रामीण विकास, कृषी, लघु उद्याेग, गृह क्षेत्राला लाभ. गृहवित्त,बँकेतर वित्त कंपन्यांना लाभ.

2 रिअल इस्टेट : अर्धवट व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांचे कर्ज पुनर्गठन न करता एक वर्ष वाढवण्यास परवानगी. रोखतेचे संकट असलेल्या विकासकांच्या व्यावसायिक प्रकल्पांची डेट ऑफ कमेन्समेंट प्रक्रिया पुढे ‌वाढवण्यास परवानगी.  परिणाम : विकासकांकडे रोकड राहील. प्रकल्प पूर्ण झाल्याने स्थानिक अर्थचक्राला गती मिळेल.

3 ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षासाठी बँका देत असलेल्या लाभांशावर बंदी. यामुळे बँकांकडे अधिक पैसे राहतील. ही बंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. 

4 एनपीए मुदतीत वाढ : कर्ज एनपीए जाहीर करण्याची मुदत ९० ऐवजी १८० दिवस करण्यात आली. बँकांना मोरेटोरियम एक्स्पोझरसाठी वेगळी १०% तरतूद करावी लागेल.  परिणाम : सवलतीच्या तीन महिन्यांत कर्ज थकीत होणार नाही. मोरेटोरियम घेणाऱ्या रिटेल, लघु,मध्यम उद्योगांना, कंपन्यांना कर्ज सुविधा सुरू राहील.

5 रिव्हर्स रेपो रेट : ०.२५% कपातीनंतर ३.७५% झाला. बँकांच्या रिझर्व्ह बँकेकडील ठेवींवरील हे व्याज आहे.  परिणाम : या दरातील कपातीमुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवण्याऐवजी ते अर्थव्यवस्थेत आणण्यास चालना मिळेल. 

6 राज्यांना अॅडव्हान्स सुविधेद्वारे ६०% जास्त रक्कम घेण्यास मुभा. वाढीव मुदत ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. यामुळे राज्यातील विकास कामे आणि इतर आवश्यक कामांसाठी नगदीचे संकट राहणार नाही. 

लघुउद्योग, शेतकरी, गरिबांना मदत मिळेल : पंतप्रधान 

या घोषणांमुळे रोख रकमेचा पुर‌वठा वाढेल. लोकांना जास्त कर्ज मिळेल. या पावलामुळे लघु-मध्यम उद्योग, शेतकरी आणि गरिबांना मदत मिळेल.  - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

लघु-मध्यम उद्योगांना अस्तित्व राखण्यास मदत : तज्ञांचे मत 

एमएसएमई क्षेत्राला मोठी मदत मिळेल. यावर ११ कोटी लोक अवलंबून आहेत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ४५%आणि निर्यातीत ४०% वाटा आहे.  - रुमकी मजुमदार, अर्थतज्ञ, डेलॉइट इंडिया

ग्रामीण भागात निर्मितीसह आणखी ४ क्षेत्रांना सवलत 

नवी दिल्ली : कोरोनामुळे हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांत २० एप्रिलपासून मिळणाऱ्या सवलती आणखी काही क्षेत्रांना मिळतील. 

 • सवलत मिळालेली नवी क्षेत्रे याप्रमाणे -
 • बँकेतर वित्तीय संस्था, गृहवित्त, मायक्रो फायनान्स, सहकारी पतसंस्था आणि इतर वित्त संस्था
 • ग्रामीण क्षेत्रात निर्मिती उद्योग, पाणीपुरवठा, सॅनिटेशन, विद्युत वाहिनी टाकण्याची कामे, दूरसंचार ऑप्टिकल फायबर आणि केबलसंबंधी कामे.
 • बांबू, नारळ, सुपारी, कोकोआ, मसाला पिंके व त्यांची कापणी, त्यावरील प्रक्रिया, पॅकिंग, विक्री आणि विपणनास परवानगी देण्यात आली आहे..
 • वन क्षेत्रांतील किरकोळ वन उत्पादने (एमएफपीएफ)/नाॅन-टिंबर वन उत्पादनांची(एनटीएफपी) तोड, साठेबाजी आणि त्यावरील प्रक्रियांवर सूट.

माजी पीएमचा नातू-माजी सीएमच्या पुत्राच्या लग्नात १०० वऱ्हाडी; लॉकडाऊन नियमभंग  

बंगळुरू : माजी पीएम एच.डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल यांच्या लग्नाला शुक्रवारी १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी आले. या वेळी कोणीही मास्क लावला नव्हता, सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही.   

सुरतच्या कापड व्यापाऱ्याने घराच्या छतावर माता-पित्याच्या उपस्थितीत असे लग्न केले  

सुरत : गुजरातमधील सुरतचे कापड व्यापारी दिशांकभाई आणि पूजा यांनी गुरुवारी आपल्या घराच्या छतावर लग्न केले. दोघांचे माता-पिता आणि पुरोहिताशिवाय या समारंभाला एकाही नातेवाइकाला निमंत्रण नव्हते.  

कोटातील विद्यार्थ्यांना गावाकडे नेण्याची तयारी 

जयपूर : राजस्थानमधील कोचिंग शहर कोटा येथे राहणाऱ्या देशभरातील  इंजिनिअरिंग व मेडिकलच्या विद्यार्थ्यांपैकी उत्तर प्रदेशातील ७५०० हून जास्त विद्यार्थ्यांना गावाकडे नेण्याच्या हालचालींवरून राजकारण तापले आहे.

बातम्या आणखी आहेत...