आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Maruti Alto K10 CNG Price | Alto K10 CNG Mileage And Specifications I Latest News And Update  

मारुती अल्टो K10 CNG लॉंच:33.85 KMचे मिळेल मायलेज; पेट्रोल मॉडेलपेक्षा 94 हजारांनी महाग, जाणून घ्या- कारचे फीचर्स

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारूती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक अल्टो K10 चे CNG मॉडेल लॉंच केले आहे. सद्यस्थितीत हे फक्त एकाच VXi प्रकारात सादर करण्यात आले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.94 लाख रुपये आहे. ही कार मारूतीच्या नियमित पेट्रोल मॉडेलपेक्षा 94 हजारांनी महागडी आहे.

33.85 KM मिळेल मायलेज

कंपनीने दावा केला की, हे सीएनजी मॉडेल कार 33.85 किमी प्रति किलो मायलेज देईल. Alto K10 पेट्रोल मॅन्युअल प्रकार 24.39 kmpl चा मायलेज देते. Alto K10 CNG ला 1.0-लिटर ड्युअलजेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन फॅक्टरी-फिट केलेल्या CNG किटला मिळते. कंपनीच्या CNG पोर्टफोलिओमधले हे तेरावे मॉडेल आहे.

Alto K10 CNG तपशील घ्या जाणून
Alto K10 CNG चे VXi प्रकार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, 2 स्पीकर, सेंट्रल लॉकिंग, AUX आणि USB पोर्ट्स आणि फ्रंट पॉवर विंडो यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ही सर्व वैशिष्ट्ये अल्टोच्या सामान्य VXi प्रकारात देखील उपलब्ध आहे. Alto K10 ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

नवीन अल्टो K10 ऑगस्ट 18 रोजी लॉंच झाली

  • कंपनीने 18 ऑगस्ट रोजी Alto K10 चे नवीन मॉडेल लॉंच केले. 2022 अल्टो K10 जुन्या अल्टोपेक्षा मोठी आहे. याचे इंजिन 998सीसीचे आहे.
  • नवीन अल्टो K10 च्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची लांबी 3,530 मिमी, रुंदी 1,490 मिमी आणि उंची 1,520 मिमी आहे. व्हीलबेसची लांबी 2,380 मिमी आणि वजन 1,150 किलो आहे.
  • हे मॅन्युअल आणि ऑटो दोन्हीमध्ये लॉंच करण्यात आले होते. यात 17 लिटर क्षमतेची इंधन टाकी आणि 177 लीटर बूट स्पेस मिळते. ग्राउंड क्लीयरन्स 160 मिमी अनलेडेड आहे.
बातम्या आणखी आहेत...