आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आजपासून म्हणजेच 16 जानेवारीपासून कारच्या किमती वाढवल्या आहेत. सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमतीत 1.1% वाढ करण्यात आली आहे. मात्र, हा बदल व्हेरियंट आणि मॉडेलनुसार असणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांच्या किमंती स्वतंत्रपणे वाढवण्यात आली आहे.
कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढणार आहे याबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा जाहीर केलेला नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे वाहनांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
आर्टिकाची किंमत 9 हजारांहून अधिक वाढली
दिल्लीमध्ये अल्टोच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3,729 रुपयांनी वाढू शकते. त्याच वेळी, आर्टिकाच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9,251 रुपयांनी वाढली आहे.
मॉडेलनुसार अशा वाढतील किमती- अंदाजानुसार
कार | किती महागडी होणार (अंदाजे) |
ऑल्टो | 3,729 रुपये |
वॅगन आर | 5,989 रुपये |
स्विफ्ट | 6,510 रुपये |
बलेनो | 7,139 रुपये |
अर्टिका | 9,251 रुपये |
कंपनीने डिसेंबरमध्ये सुमारे 1.16 लाख वाहनांची विक्री केली
मारुती सुझुकीने डिसेंबर 2022 मधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले. डिसेंबर महिन्यात कंपनीने एकूण 1,16,662 युनिट्सची विक्री केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये कंपनीने एकूण 1,59,044 मोटारींची विक्री केली होती.
कंपनीने जीम्नी लॉंच केली
मारुतीने ऑटो एक्सपोमध्ये आपली ऑफ रोडर एसयूव्ही जिम्नी लॉंच केली. जिम्नीचे 4 व्हील ड्राइव्ह आणि 5 डोअर व्हर्जन भारतात आणले आहे. मारुतीने जिमनीचे बुकिंगही सुरू केले आहे. कंपनी त्याची प्रीमियम डीलरशिप Nexa द्वारे विक्री करेल. ग्राहक 11,000 रुपये भरून ते बुक करू शकतात. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिम्नी रस्त्यावर दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.