आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने कोरोना संसर्गात ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता आपल्या शो रूम्ससाठी नवे एसओपी(स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी केली आहे. कंपनीने सांगितले की, नव्या एसओपीमध्ये शोरूममध्ये उच्च पातळीवर स्वच्छता आणि स्वच्छता निश्चित करण्यावर भर दिला आहे.
कंपनीद्वारे जारी निवेदनानुसार, ग्राहकाच्या शोरूममध्ये प्रवेश करण्यापासून त्यांना वाहन देण्यापर्यंतच्या सर्व बाजू लक्षात घेत नियम तयार केले आहेत. कंपनीने सांगितले की, या एसओपीला लागू करणे आणि स्थानिक राज्य सरकारांकडून मंजुरी घेतल्यानंतर कंपनीने आपल्या डीलर शोरूम उघडण्याची सुरुवात केली आहे. यासोबत ग्राहकांना कारचा पुरवठाही सुरू केला आहे. निवेदनानुसार, ग्राहकांच्या शोरूमधील प्रवेशापासून त्यांना वाहनाच्या डिलिव्हरीपर्यंतच्या सर्व बाबी लक्षात घेत नियम तयार केले आहेत. या सर्व मानक प्रक्रिया शास्त्रीय अभ्यासावर आधारित आहेत. एसओपी लागू करणे आणि स्थानिक राज्य सरकारांकडून मंजुरी घेतल्यानंतर कंपनीने आपले डीलर शोरूम उघडणे सुरू केले आहे. यासोबत ग्राहकांना शोरूमवर टेस्ट ड्राइव्हच्या गाड्यांची नियमित स्वच्छता केली जाईल. सर्व कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी होईल.
गाड्यांची डिजिटल बुकिंग, होम डिलिव्हरी
ग्राहक आपल्या आवडीची कार आणि अॅसेसरीजची बुकिंग घरबसल्या ऑनलाइन करू शकतात. यासाठी मारुती सुझुकी.कॉम आणि नेक्सएक्सपेरियन्स.कॉम बेवसाइट्सला भेट द्यावी लागेल. कारची डिलिव्हरी ग्राहकांना घरापर्यंत दिली जाईल. डिलिव्हरीआधी कारला पूर्णपणे संसर्गरहित केले जाईल. जो स्टाफ गाडीला घेऊन तुमच्या घरी येईल त्याने मास्क घातलेला असेल व सॅनिटायझरचा वापरही असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.