आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक व इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा दुसऱ्या टप्प्यातील नोकरकपात करण्याची योजना तयार करत आहे. त्यानुसार, ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये मेटा चालू आठवड्यात आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमाशी संबंधित लोकांचा दाखला देत हा दावा करण्यात आला आहे. मेटाने संचालक व उपाध्यक्षांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिलेत.
मेटाने गतवर्षी पहिल्या टप्प्यात आपल्या 13 टक्के म्हणजे 11,000 कर्मचार्यांना काढून टाकले होते. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी नोकरकपात करण्यात आली होती. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी चुकीच्या निर्णयांमुळे महसुलात घट झाल्याचे कारण दिले होते.
मार्क म्हणाले होते, 'आज मी मेटाच्या इतिहासातील काही सर्वात कठीण निर्णयांची माहिती देत आहे. आम्ही आपल्या टीम साइजमध्ये जवळपास 13 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 11 हजारांहून अधिक प्रतिभावंत कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल. आम्ही खर्चात कपात करून Q1 पर्यंत हायरिंग फ्रीज वाढवून अधिकाधिक कुशल कंपनी बनवण्यासाठी हे पाऊल उचलत आहोत.
कंपनी या स्थितीत कशी पोहोचली?
मार्क म्हणाले होते, 'कोविडच्या सुरुवातीला जग वेगाने ऑनलाइन झाले होते. ई-कॉमर्स वाढल्यामुळे महसुलात वाढ झाली होती. अनेकांनी ही वाढ स्थायी असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच ही वाढ महामारी संपल्यानंतरही कायम राहण्याचा दावा केला होता. त्यामुळे मी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने हा निर्णय माझ्या अंदाजानुसार योग्य ठरला नाही.
ऑनलाइन कॉमर्स पूर्वीच्या ट्रेंडमध्ये परतला नाही, तसेच मायक्रो इकोनॉमिक डाउनटर्न, कॉम्पिटिशन व कमी जाहिरातींमुळे महसुलातही माझ्या अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. माझ्याकडून ही चूक झाली. मी त्याची जबाबदारी घेतो. या नव्या वातावरणात, आपल्याला अधिक भांडवल कार्यक्षम बनण्याची गरज आहे. आम्ही संसाधने उच्च प्राधान्य वाढीच्या क्षेत्रात हलवली आहेत.
AI डिस्कव्हरी इंजिन, जाहिराती व बिझनेस प्लॅटफॉर्म व मेटाव्हर्ससाठी आमचे लाँग टर्म व्हिजन आहे. आम्ही व्यवसायाच्या खर्चात कपात केली. यामुळे बजेट कमी करणे, भत्त्यांत कपात करणे व रियल इस्टेट फुट प्रिंट कमी करण्याचा समावेश आहे. आम्ही आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीम्सची पुनर्रचनाही करत आहोत. पण या उपायांमुळे आपला खर्च महसूलाच्या तुलनेत कमी होणार नाही. त्यामुळे मी आपल्या लोकांना जाऊ देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.'
मेटात होते 87,314 कर्मचारी
सप्टेंबर 2022 च्या अखेरीस मेटामध्ये 87,314 कर्मचारी होते. मेटा सद्या व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व फेसबुकसह जगभरातील काही सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची मालक आहे. कंपनीने मेटाव्हर्सवरील आपला खर्च वाढवला आहे.
मेटाव्हर्स एक आभासी जग आहे. तिथे युजर स्वतःचा अवतार बनवू शकतो. लॉ अडॉप्टेशन रेट व महागड्या R&D मुळे कंपनीला सातत्याने तोटा होत आहे. नोकरकपातीमुळे कंपनीपुढे आर्थिक संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.