आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा:चांगल्या मिडकॅप शेअर्समध्ये 60 टक्के घसरण; तेजी येणार, मिडकॅप सेन्सेक्स-निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी करतील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१ मध्ये सेन्सेक्समध्ये २१% वाढ झाली होती, परंतु बीएसई मिडकॅप निर्देशांकात ३८% वाढ रशिया-युक्रेन संकटाच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरताना दिसत आहे. मिडकॅप निर्देशांक येत्या काही महिन्यांत सेन्सेक्स-निफ्टीला मागे टाकू शकतात. खरे तर गेल्या सहा महिन्यांत निफ्टी-सेन्सेक्स त्याच्या सर्वोच्च पातळीपासून केवळ ८.७२% घसरला आहे, परंतु या काळात निफ्टी-५००० निर्देशांकातील शेअर्समध्ये ६० टक्क्यांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हेदेखील दर्जेदार मिडकॅप्स आहेत आणि सध्या यात गुंतवणुकीची एक आकर्षक संधी आहे.

निफ्टी-५०० निर्देशांकातील ५०० समभागांपैकी ३४० समभाग ६ महिन्यांपूर्वीच्या तुलनेत अजूनही खाली आहेत. यातील १३९ शेअर्स २०% वरून ६०% पर्यंत घसरले आहेत. ५५ समभागांमध्ये ३०-६०% आणि १२ समभागांमध्ये ३०-६०% घसरण दिसून येत आहे. आता बाजार स्थिरावत असल्याने मिडकॅप समभागांचा कल उलटण्याची शक्यता आहे.

निफ्टी-५०० मधील समभाग हेसूचीबद्ध असलेल्या सुमारे ७,५०० निवडक समभाग आहेत. पुढील १-२ महिन्यांत सेन्सेक्स-निफ्टी मजबूत होईल आणि गुंतवणूक वाढेल असा आमचा अंदाज आहे - एस रंगनाथन, संशोधनप्रमुख, एलकेपी सिक्युरिटीज

निफ्टी-५०० मध्ये वाढतेय गुंतवणूक
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, एफपीआयने आतापर्यंत निफ्टी-५०० समभागांमध्ये जोरदार विक्री केली आहे. त्यामुळे त्यांच्या किमती घसरल्या असून मूल्यांकन आकर्षक झाले आहे. आता म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याहूनही अधिक विमा कंपन्या, बँका, एचएनआय आणि किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

जास्त घसरण झालेले मिडकॅप शेअर्स
शेअर्स 30 सप्टें. 15 मार्च घसरण
धानी सर्व्हिसेस 183 73 -60%
सोलारा अॅक्टिव्ह फार्मा 1,599 704 -56%
दिलीप बिल्डकॉन 568 251 -56%
इंडिया मार्ट इंटरमेश 8,379 4,352 -48%
स्ट्राइड्स फार्मा सायन्स 589 315 -46%
इंडो काउंट इंडस्ट्रीज 296 160 -46%
एचईजी लिमिटेड 2,248 1,286 -43%
सिक्वेंट सायंटिफिक 220 126 -42%
वैभव ग्लोबल 699 402 -42%

गेल्या तीन महिन्यांतील मिडकॅप निर्देशांकाची परिस्थिती अशी
निर्देशांक 6 महिने 1 वर्ष 3 वर्षे
सेन्सेक्स -5.02% 10.68% 46.69%
निफ्टी -4.89% 11.61% 45.82%
बीएसई मिडकॅप -8.17% 13.34% 52.62%
निफ्टी मिडकॅप -4.73% 11.74% 56.91%

बातम्या आणखी आहेत...