आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान:चांगल्या नेटवर्कसाठी लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट नितांत आवश्यक; घरी सिग्नल येत नसेल तर हे 5 सोपे उपाय करून पाहा

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉल ड्रॉपची समस्या आजही कायम आहे. पण काही उपायांद्वारे फोनचे नेटवर्क सिग्नल सुधारले जाऊ शकतात. टेक गुरू अभिषेक तैलंग यांच्याकडून या उपायांविषयी जाणून घेऊया…

सर्व प्रथम, घरात कमकुवत सिग्नल कोठे येतात ते शोधा. याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचा फोन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घेऊन जाणे व फोनच्या सिग्नल बारवर लक्ष ठेवणे. घराच्या ज्या भागांमध्ये सिग्नल बार कमी दिसतात, तिथे नेटवर्क सिग्नल सुधारण्याची गरज असल्याचे लक्षात घ्या.

स्मार्ट सिग्नल बूस्टर
मोबाइल सिग्नल सुधारण्यासाठी तुम्ही मोबाइल स्मार्ट सिग्नल बूस्टर वापरू शकता. स्मार्ट सिग्नल बूस्टर शक्तिशाली बेसबँड प्रोसेसरद्वारे सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते साफ करतात. त्यानंतर ते तुम्हाला सिग्नल पाठवते. स्मार्ट सिग्नल बूस्टर वापरणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त ते प्लग इन करायचे आहे. हे अॅनालॉग सिग्नल बूस्टरपेक्षा थोडे महाग आहेत, तथापि, तुमच्या घरभर कमकुवत सिग्नल असेल तर हा एक चांगला पर्याय आहेत.

सेल्युलर रिपीटरचा वापर
तुमच्या घरातील एखाद्या खोलीत सिग्नलची समस्या असल्यास, सेल्युलर रिपीटर तुमच्यासाठी एक चांगला व स्वस्त पर्याय ठरेल. एक चांगला सेल्युलर रिपीटर 2500 ते 6000 रुपयांमध्ये सहज मिळू शकतो. सेल्युलर रिपीटरचा अँटेना किमान 2 बार सिग्नल प्राप्त करणाऱ्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला ते स्थापित करताना काही समस्या येऊ शकतात, त्यामुळे तांत्रिक मदतीची आवश्यकता भासू शकते.

वायफाय कॉलिंग वैशिष्ट्य
लेटेस्ट फोन वायफाय कॉलिंग वैशिष्ट्यासह येतात. यामुळे कमकुवत नेटवर्क सिग्नल असल्याच्या स्थितीत तुम्हाला कॉल करण्यासाठी तुमच्या घरचे वायफाय वापरता येते. या फीचरमुळे एकही रुपया खर्च न करता तुमची समस्या सोडवली जाऊ शकते. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते सक्षम अर्थात चालू करावे लागेल.

सॉफ्टवेअर अपडेट
चांगल्या नेटवर्कसाठी फोनमध्ये नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट आवश्यक आहे. कारण अनेक वेळा कंपन्या अपडेटद्वारे नेटवर्कसह इतर गोष्टी दुरुस्त करत असतात. याशिवाय नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स फोनवर सिग्नल रिसेप्शन सुधारण्यासही मदत करतात. फोन निर्माते किरकोळ बग व बदलत्या तंत्रज्ञानासाठी सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये सॉफ्टवेअर पॅच जोडत राहतात. अनेक वेळा नेटवर्क प्रदात्याकडून तांत्रिक सुधारणा होते, जे तुमच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे तुम्हाला मिळत नाही. यामुळे फोनमध्ये कमी सिग्नल मिळू लागतात.

नेटवर्क अँटेना समस्या
फक्त तुमच्याच फोनला लो सिग्नल तर मिळत नाही ना? हे देखील तपासून घ्या. जर तुमच्या फोनला घराच्या एका भागात खराब सिग्नल मिळत असेल व इतर लोकांच्या फोनला चांगले सिग्नल मिळत असतील तर समस्या तुमच्या फोनची असू शकते नेटवर्कची नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला एकतर फोनचा नेटवर्क अँटेना बदलावा लागेल किंवा नवीन फोन घ्यावा लागेल.