आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑगस्ट महिन्याला सुरूवात झालेली असून याच महिन्यात स्वातंत्र्यदिनापर्यंत अर्थात 15 ऑगस्टपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होणार आहे. एअरटेल टेलिकॉम कंपनी ही 5G सेवा सुरू करणारी देशातील दुसरी कंपनी ठरणार आहे. यासाठी कंपनीने एरिक्सन, नोकीया आणि सॅमसंगसोबत करार केलेले आहेत. दुसरीकडे जिओने देखील 15 ऑगस्टला देशभरात 5G नेटवर्क सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
अर्थातच 5G सेवा कार्यान्वित झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढणार आहे. एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी सांगीतले की, देशातील ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसमवेत काम करणार आहे.
4G पेक्षा 5G दहा ते पंधरा टक्के महाग असेल
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, 5G सेवांचे दर कंपनी ठरवतील. त्यामुळे 5G सेवांचे दर 4G च्या बरोबरीने आणण्यासाठी 5G सेवा सुरुवातीला 10 ते 15 टक्क्याच्या प्रीमियमवर ऑफर केल्या जातील, अशी उद्योगतज्ज्ञांची अपेक्षा आहे.
5G सुरू झाल्यानंतर काम अधिक सोपे होईल
भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू झाल्याने बरेच काही बदलणार आहे. यामुळे लोकांचे काम तर सोपे होईलच. पण मनोरंजन आणि दळणवळण क्षेत्रातही खूप बदल होतील. एरिक्सन 5G साठी काम करणार्या कंपन्यांना विश्वास आहे की, 5 वर्षांत भारतात 500 दशलक्ष 5G इंटरनेट वापरकर्ते असतील.
5G सुरू करताच काय होतील फायदे ?
जगभरातील 1,336 देशात 5G नेटवर्क
Speedtest Intelligence यांच्यानुसार, दक्षिण कोरीया 2021 च्या तीन तिमाहीत जगातील सर्वात वेगवान 5G सेवा वापरत आहे. त्याचा वेग 462.48 Mbps आहे. 426.75 Mbps स्पीडसह नॉर्वे दुसर्या क्रमांकावर आहे. युनाइटेड अरब अमीरात 409.96 Mbps स्पीडसह तृतीय स्थानावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.