आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन:आधुनिक व्यवस्थापकाचा अधिकाधिक वेळ नाती जोडण्यामध्येच जातो

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवस्थापन महाविद्यालयांसाठी आध्यात्मिक प्रशिक्षण हा पूर्णपणे वेगळा विषय असू शकतो. तरीही, एचईसी पॅरिस या एका संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना सेंट बेनेडिक्टकडून प्रेरित शिक्षकाकडून नैतिक धडे घेण्यासाठी फ्रान्समधील एका दुर्गम गावात पाठवले. व्यवसाय धोरणावर केंद्रित असलेला एमबीए अभ्यासक्रम आणखी कसा सुधारला जाऊ शकतो, हे ते दर्शवते. इकडे कॉर्पोरेट जग खूप बदलत आहे.

आधुनिक व्यवसायाच्या व्यवस्थापनात गुंतलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना वेळ द्यावा लागतो. यापैकी काही कर्तव्ये नवीन कॉर्पोरेट भूमिकांमध्ये जोडली गेली आहेत. ब्रिटनचे प्रिन्स हॅरी हे सिलिकॉन व्हॅली कंपनीचे चीफ इम्पॅक्ट ऑफिसर आहेत. क्लिफर्ड चान्स लॉ फर्मने कर्मचारी कल्याणासाठी जागतिक अधिकारी नियुक्त केला आहे. लिंक्डइन सोशल नेटवर्कमध्ये सुमारे पाच हजार लोक स्वतःला चीफ हॅपीनेस ऑफिसर संबोधतात.

कर्मचारी आणि इतरांना अधिक वेळ दिल्याने उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांची रणनीती आखण्यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी कमी वेळ मिळतो. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे मायकेल पोर्टर व नितीन नोहरिया यांनी २००६ पासून कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दिनचर्येचा आढावा घेतला. त्यांना आढळले की, कंपनीचे बॉस त्यांचा २५% वेळ कंपनीच्या आत व बाहेर नाती जोडण्यात घालवतात. ते रणनीतीवर २१%, कॉर्पोरेट संस्कृतीवर १६%, सामान्य उपक्रमांवर ११% आणि सौदे आणि करारांवर ४% वेळ खर्च करतात. मनुष्यबळ प्रमुखांनी अहवाल दिला की, व्यवस्थापक कर्मचाऱ्यांबरोबर अधिक वेळ घालवतात. कोविड-१९ च्या आधी कंपनीचे बॉस आणि उच्च अधिकारी संमिश्र काम करत असत.

एमबीए अभ्यासक्रमात बदल
२१व्या शतकातील एक्झिक्युटिव्हच्या जबाबदाऱ्या बदलल्यामुळे एमबीए अभ्यासक्रमातही बदल झाले आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलने आपल्या अभ्यासक्रमाला रिइमॅजिनिंग कॅपिटलिझम नाव दिले आहे. इनसीड ही फ्रेंच संस्था विद्यार्थ्यांना व्यवसाय व समाजाबद्दल शिकवते. अनेक एमबीए प्रोग्राम्स वन-टू-वन संबंधांवर केंद्रित असतात. काही अभ्यासक्रम झूम कॉन्फरन्सिंग युगासाठी विद्यार्थ्यांना तयार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...