आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • More Interest Than FD Is Getting In The Kisan Vikas Patra Scheme Of The Post Office, Your Money Is Also Safe; News And Live Updates

फायद्याची गोष्ट:पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज; तुमचे पैसेदेखील राहतील सुरक्षित

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडीच वर्षांचा आहे लॉक-इन कालावधी

पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेसह अनेक बँकांनी अलीकडेच एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात मोठे बदल केले आहे. देशातील बहुतेक बँका एफडीवर 5 ते 6% पर्यंत व्याज देत आहेत. परंतु, अशा परिस्थितीत तुम्हाला यापेक्षा जास्त व्याज हवे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) बचत योजनेत पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला 6.9% व्याज मिळत आहे. त्यामुळे ही योजना काय आहे? यामध्ये पैशाची कशी गुंतवणूक करावी? याबद्दल सर्वकाही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या योजनेत 6.9% मिळत आहे वार्षिक व्याज
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र बचत योजनेअंतर्गत एक प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. कोणालाही हे खरेदी करता येऊ शकते. हे प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस बॉण्डप्रमाणे जारी केले जाते. या योजनेवर निश्चित दराने व्याज मिळते. देशभरता असलेल्या पोस्ट ऑफिसमधून हे खरेदी करता येत असून यावर सध्या 6.9% व्याज दिले जात आहे.

आपण कितीही पैसे गुंतवू शकता?
किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. परंतु, आपली किमान गुंतवणूक 1000 रुपये असावी. आपण 100 रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता. गुंतवणूक करण्याची कमला मर्यादा नसल्याने आपण कितीही गुंतवणूक करु शकता.

खाते हस्तांतरित करता येणार
या योजनेचे वैशिष्टे म्हणजे हे प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरीत केले जाऊ शकते. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्टमध्येदेखील हस्तांतरित करता येईल. त्यामुळे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने ग्राहकांना याचा फायदा होतो.

संयुक्त खाते उघडण्याची सुविधा
किसान विकास पत्रात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत सिंगल अकाउंट वगळता संयुक्त खाते उघडण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. अल्पवयीन देखील या योजनेत सामील होऊ शकतात. परंतु, त्या खात्यावर त्यांच्या पालकांनी देखरेख करावी लागणार आहे.

अडीच वर्षांचा आहे लॉक-इन कालावधी
जर तुम्हाला तुमची गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर तुम्हाला किमान अडीच वर्षे (30 महिने) वाट पाहावी लागेल. या योजनेत कमीतकमी अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. म्हणजेच, तुम्ही इतकी वर्षे या योजनेतून पैसे काढता येणार नाही.

किती वेळात पैसे होतील दुप्पट?
जर तुम्ही किसान विकास पत्रात पैसे गुंतवले आहे. सध्या या योजनेत 6.9 टक्के व्याजदर दर आहे. सध्याच्या व्याजदराने सुमारे 10 वर्ष 4 महिन्यांत (124 महिने) आपला पैसा दुप्पट होईल.

देशातील मोठ्या बँका अडीच वर्षांच्या एफडीवर किती व्याज देतात?

बँकव्याज दर (%)
SBI5.10
पंजाब नॅशनल बँक5.10
बँक ऑफ बडोदा5.10
ICICI5.15
HDFC5.15
बातम्या आणखी आहेत...