आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • More Than 18% New Jobs In March, 48% Growth In Travel hospitality Jobs,|jobs In All Major Sectors In March|Marathi News

रोजगाराची संधी:मार्चमध्ये 18% पेक्षा जास्त नवीन नोकऱ्या, ट्रॅव्हल-हॉस्पिटॅलिटी नोकऱ्यांत 48% वाढ, सर्व प्रमुख क्षेत्रातील नोकऱ्यांत 10% वाढ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगाराच्या आघाडीवर देशाने मोठे यश संपादन केले आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे मार्चमध्ये जवळजवळ सर्व प्रमुख क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वार्षिक १८.४% वाढ झाली. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये सर्वाधिक नोकऱ्या ४७.६% वाढल्या. क्वेस कॉर्प या व्यवसाय सेवा पुरवठादार कंपनीच्या अाॅलसेकच्या ताज्या अहवालानुसार ऊर्जा क्षेत्रातील कामगारांच्या संख्येत वार्षिक अाधारावर ४१.५% वाढ झाली आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या कोविडपूर्व पातळीपासून सर्वाधिक १७८.३% वाढली आहे. तसे त्यात वार्षिक आधारावर २७.३% वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात अायटी आणि अायटीई क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येतही २७% वाढ झाली आहे. आर्थिक आणि अन्न आणि पेय क्षेत्रातही नवीन नोकऱ्या वाढल्या आहेत. दुसरीकडे, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वार्षिक आधारावर घट झाली आहे.

ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात २०२० च्या तुलनेत अजूनही २४.३ % कमी कर्मचारी आहेत. महामारीमुळे मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ४८.७ टक्क्यांनी कमी झाली. पण मॉन्स्टर डॉट कॉमचे सीईओ शेखर गारिसा म्हणाले की, आता हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वेगाने सुधारणा होत आहे

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या मागणीत वाढ
हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष केबी कचरू यांनी सांगितले की, कोविडचा प्रभाव कमी झाल्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योगात वेगाने सुधारणा हाेत असून कर्मचाऱ्यांची मागणी देखील झपाट्याने वाढत आहे.

येत्या काही महिन्यांतही सकारात्मक दृष्टिकोन राहील
मार्चमध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांतील नोकऱ्यांबाबत सकारात्मक पुनर्प्राप्ती पॅटर्न होता. प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्र आघाडीवर आहे. येत्या काही महिन्यांतही हा नमुना दिसून येईल अशी आमची अपेक्षा आहे.
-आशिष जोहरी, सीईओ, ऑलसेक टेक्नॉलॉजीज

४ क्षेत्रांत कोविडपूर्व पातळीपेक्षा जास्त रोजगार
क्षेत्र 2021 ते 222020 ते 22
ट्रॅव्हल- हॉस्पिटॅलिटी47.6% -24.3%
ऊर्जा 41.5% 42%
लॉजिस्टिक 27.3% 178.3%
अायटी/अायटीई 27% 29.4%
अन्न आणि पेय 12.9% 19%
तीन क्षेत्रात कमी होऊ लागल्या नोकऱ्या
आरोग्यसेवा -8.3% -9.4%
ई-कॉमर्स -1.5% 41.8%
घाऊक/किरकोळ व्यापारी -2.1% -23.9%

बातम्या आणखी आहेत...