आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • More than 200 handicraft centers in the field of fashionable face masks exports also continue

कोरोना इफेक्ट :200 पेक्षा जास्त हस्तकला केंद्रे फॅशनेबल फेसमास्कच्या क्षेत्रात, निर्यातही सुरू

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 12,500 पेक्षा जास्त हस्तकला केंद्रे, हस्तकला केंद्रांत 40 लाख लोकांना रोजगार

प्रमोदकुमार शर्मा 

कोरोना महारोगराईमुळे बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी जवळपास २०० हस्तकला निर्यात केंद्रांनी फॅशन फेस मास्कचे उत्पादन आणि निर्यात सुरू केली आहे. यात आणखी काही केंद्रे लवकरच या क्षेत्रात उतरण्याची तयारी करत आहेत. केंद्र सरकारने हस्तकला केंद्रांना फॅशन फेस मास्कचे उत्पादन आणि निर्यातीस परवागनी दिली आहे. देशात १२,५०० पेक्षा जास्त हस्तकला केंद्रे आहेत. यामध्ये सुमारे ४० लाख कारागिरांना थेट रोजगार मिळाला आहे. टाळेबंदीदरम्यान जवळपास २ महिने बंद राहिल्यानंतर हस्तकला केंद्रे सुरू झाली आहेत. आतापर्यंत जवळपास ४ हजार केंद्रांत उत्पादन सुरू झाले आहे. एक्स्पोर्ट प्रमोशन काैन्सिल ऑफ हँडिक्राफ्ट्स(ईपीसीएच) महासंचालक राकेश कुमार यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे मागील वित्त वर्ष २०१९-२० मध्ये २५,०२७ कोटींच्या हस्तकलेच्या उत्पादनांची निर्यात झाली. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत २% कमी आहे. उद्दिष्ट ३०,००० कोटी रुपयांचे होते. एप्रिल २०१९ पासून फेब्रुवारी २०२० पर्यंत ही निर्यात १५% पेक्षा जास्त वाढले होती. मात्र,अमेरिका, इटली, स्पेन, ब्राझील व जपान या देशांतून ऑर्डर रद्द झाल्याने मार्चमध्ये १,००० कोटी हस्तकला उत्पादनांची निर्यात होऊ शकली.


मनरेगामध्ये हस्तकलेचा समावेश करण्याची शिफारस

टाळेबंदीमुळे दोन महिन्यांपासून अनेक निर्यातदारांचे हस्तकला केंद्रे बंद आहेत. यामुळे एप्रिल-जून तिमाहीत त्यांच्या वीज बिलाात कायम शुल्कात सूट, कामगारांच्या वेतनाची निम्मी रक्कम सरकारद्वारे अदा करणे आणि विविध खर्चासाठी पॅकेजची मागणी केली आहे. याचे जीएसटी रिफंड त्वरित परत करण्याचीही विनंती केली आहे.

एक लाख कोटीत केवळ २५% देशाच्या उत्पादनांची हिस्सेदारी

देशात जवळपास १ लाख कोटी रुपयांची हस्तकलेची बाजारपेठ आहे. देशातील उत्पादकांची हिस्सेदारी २५% आहे. कोरोना संसर्गामुळे देशी-विदेशी पर्यटकांची ये-जा बंद झाल्याने जयपूर, आग्रा व खजुराहोसह अन्य शहरांत चालणाऱ्या हस्तकला शोरूम्सना झटका बसला आहे. या शोरूम दरवर्षीे १०,००० कोटींचा व्यवसाय करतात.


निर्यातीत दिवाळीच्या आसपास तेजी शक्य

या वर्षी एप्रिल-मे महिन्यात हस्तकला उत्पादनांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८% राहिली. विदेशी बाजारांतून ऑर्डर कमी मिळाल्या आहेत. दिवाळीच्या आसपास हस्तकला व्यवसायत तेजीत येण्याची शक्यता आहे. - राकेश कुमार, डीजी, ईपीसीएच.

0