आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनमधील सर्वात माेठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचा शॉपिंग फेस्टिव्हल सिंगल डे बुधवारपासून (११ नाेव्हेंबर) सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात माेठा शॉपिंग फेस्टिव्हल आहे. हा उत्सव चाेवीस तास चालणार आहे. कंपनीचा बंपर सेल सुरू हाेताच जगभरातील लाेकांनी प्रत्येक सेकंदाला सरासरी ५.८३ लाख ऑर्डर दिल्या. सुरुवातीच्या अर्ध्या तासात ५६.३ अब्ज डाॅलरची (सुमारे ४.१८ काेटी रुपये) विक्री झाली. त्यामुळे २०१९ मधील चाेवीस तासांतील विक्रीचा विक्रम माेडला आहे. गेल्या वर्षी कंपनीने चाेवीस तासांत ३८ अब्ज डाॅलर (सुमारे २.८२ लाख काेटी रुपये) एवढी विक्री केली हाेती. विक्री इव्हेंटच्या थेट वृत्तांकनानुसार जगातील अव्वल दहा देश चीनमधून खरेदी करू लागले आहेत. त्यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, स्पेन, ऑस्ट्रेलिया, जपान, काेरिया, कॅनडाचा समावेश आहे.
वास्तविक चीनबद्दल अमेरिकेला राग असल्याचे वाटत हाेते. परंतु, अमेरिकेतील लाेक चीनकडून वस्तूंची खरेदी करणे पसंत करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. दुसरीकडे ही विक्री सुरू हाेताच हाँगकाँग मार्केटमध्ये अलिबाबाचा शेअर स्थानिक वेळेनुसार २.०९ वाजेपर्यंत ८.१३ टक्क्यांवर हाेता. काेराेना महामारीमुळे चीनमध्ये ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीला महत्त्व दिले आहे. देशातील ऑनलाइन रिटेल खरेदीत ग्राहकांनी आधीच सुमारे ३० टक्के खरेदी केली आहे. त्याचा अलिबाबाला लाभ झाला आहे.
अमेरिकेच्या ब्लॅक फ्रायडेपेक्षा जास्त प्रसिद्ध इव्हेंट
२००९ पासून सुरू झालेला सिंगल डे इव्हेंट खरेदीच्या दृष्टीने दरवर्षी नवा विक्रम नाेंदवत आहे. यंदा कंपनीने सुरुवातीच्या काही मिनिटांत जबरदस्त िवक्रम नाेंदवला. सुरुवातीच्या तासाभरात प्रतिसेकंद ५ लाख ८३ हजार ऑर्डर बुक केल्या. सध्या बंपर सेल गुरुवारपर्यंत चालेल. ई-कॉमर्स दिग्गज अलिबाबाचा हा सिंगल डे सेल इव्हेंट अमेरिकेच्या ब्लॅक फ्रायडे व सायबर मंडेपेक्षा लाेकप्रियतेतदेखील शिखरावर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.