आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • More Than Half Of Smallcap Returns In 10 Years, Less Than The Sensex, Small Cap Investments Are Not Always A Lucrative Deal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:10 वर्षांत निम्म्याहून अधिक स्मॉलकॅपचा परतावा सेन्सेक्सपेक्षाही कमी, स्मॉल कॅप गुंतवणूक नेहमी फायद्याचा सौदा नाही

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2011 मध्ये टॉप 250 मध्ये समाविष्ट स्मॉल कॅपपैकी तीनच झाल्या लार्ज कॅप

नवे गुंतवणूकदार आणि जास्त जोखीम उचलण्यात सक्षम गुंतवणूकदार बऱ्याचदा स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर हे भविष्यात या कंपन्या लार्ज कॅप होतील अाणि त्यांना अनेक पटीने फायदा होईल या हेतूने खरेदी करतात. मात्र, गेल्या एका दशकाचे आकडे पाहिल्यास तसे होण्याची शक्यता खूप कमी राहते. ३१ मार्च २०११ रोजी टॉप-२५० स्मॉल कूपमध्ये समाविष्ट कंपन्यांमध्ये केवळ तीन कंपन्याच गेल्या १० वर्षांमध्ये लार्ज-कॅपमध्ये समाविष्ट होऊ शकल्या. एवऐच नव्हे तर, टॉप-२५० मध्ये समाविष्ट निम्म्याहून अधिक स्मॉल कॅप शेअर तर सेन्सेक्स समान रिटर्न देण्यात यशस्वी राहिलेल्या नाहीत. काही स्मॉल कॅप कंपन्या डिलिस्ट होऊन या स्पर्धेबाहेर पडल्या आहेत. विश्लेषकांनुसार, कोणत्या कंपनीसाठी स्मॉल कॅपमधून लार्ज-कॅप होण्यासाठी १० वर्षांच्या दीर्घावधीच्या हिशेबाने एक चांगला कालावधी आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत कोणत्याही कंपनीच्या स्मॉल-कॅपमधून लार्ज-कॅपमध्ये येण्याची शक्यता केवळ १२ टक्के राहिली आहे. टॉप-२५० स्मॉल कॅप कंपन्यांपैकी १३७ कंपन्यांच्या शेअर्सचा परतावा सेन्सेक्सच्या ९.८%च्या रिटर्न(सीएजीआर)पेक्षाही कमी राहिला आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना अॅम्फी बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांना त्यांच्या बाजार भांडवलाच्या आधारावर लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये वर्गीकृत करते. टॉप-१५० कंपन्या मिड-कॅप आणि त्यानंतर येणाऱ्या कंपन्या स्मॉल-कॅप संबोधल्या जातात. या विश्लेषणाच्या आधारावर कंपन्यांना ३१ मार्च २०११ आणि ३१ मार्च २०२१ रोजी वर्गीकृत केले आहे. स्मॉल-कॅप कंपन्यांची यादी बरीच लांब आहे. त्यामुळे विश्लेषणात या श्रेणीला टॉप-२५० कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवले आहे. याच पद्धतीने टॉप-२५० कंपन्यांपैकी ज्या तीन स्मॉल कॅप कंपन्या टॉप १०० म्हणजे, लार्ज कॅप झाल्या आहेत, त्यात बजाज फायनान्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट फंड फायनान्स व हनीवेल ऑटोमेशनचा समावेश आहे. केवळ २७ कंपन्या नेक्स्ट टॉप-१५० म्हणजे, मिडकॅपच्या श्रेणीत स्थान मिळवू शकल्या. यात एमआरएफ, माइंडट्री, पीआय इंडस्ट्रीज, पेज इंडस्ट्रीज व बालकृष्ण इंडस्ट्रीजची प्रमुख नावे आहेत. डिलिस्ट होऊन शेअर बाजाराबाहेर पडलेल्या आठ कंपन्या आहेत. याच पद्धतीने २१२ कंपन्या १० वर्षांनंतरही स्मॉल-कॅपच्या श्रेणीत कायम आहेत.

बातम्या आणखी आहेत...