आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी भरती:चार मोठ्या आयटी कंपन्यांनी सहामाहीत दिल्या एक लाखापेक्षा जास्त नोकऱ्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तिमाहीपासून देशात सुरू झालेली आयटी कंपन्यांचा कर्मचारी भरतीचा वेग दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढला आहे. २०२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील चार बड्या आयटी कंपन्यांनी ४८,२९५ कर्मचाऱ्यांची भरती केली हाेती. दुसऱ्या तिमाहीत नवीन नाेकऱ्यांची संख्या वाढून ५३,९६४ झाली आहे. अशा प्रकारे २०२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चार कंपन्यांनी केलेली एकूण कर्मचारी भरती एक लाखाच्या वर गेली आहे.

कंपन्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक निकालांनुसार दुसऱ्या तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नवीन १९,६९० कर्मचाऱ्यांची भरती केली तर इन्फाेसिसने आपल्या मनुष्यबळामध्ये ११,६६४ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. विप्राेने ११,४७५ आणि एचसीएल टेकने ११,१३५ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एखाद्या एका तिमाहीत इन्फाेसिसने केलेली ही सर्वात माेठी भरती आहे. एचसीएल टेकने गेल्या २४ तिमाहीनंतर सर्वात जास्त नाेकऱ्या दिल्या आहेत.

क्लाऊड काॅम्प्युटिंग आणि डेटा अॅनालिटिक्स सारख्या डिजिटल सेवांची मागणी वाढत आहे आणि आयटी कंपन्या त्याच्याशी संबंधित लाेकांच्या भरतीचे प्रमाण वाढवत आहेत. नवीन उमेदवारांसाठी नाेकऱ्यांच्या संधी खूप वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.टीसीएसने गेल्या सहामाहीमध्ये जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त नवीन उमेदवारांची भरती केली आहे.

पुढील सहामाहीमध्ये आणखी ३५ हजार नवीन नाेकऱ्या देण्याची कंपनीचा विचार आहे. इन्फाेसिसने चालू आर्थिक वर्षामध्ये ४५,००० नवीन उमेदवारांना नाेकऱ्या देण्याचा मनाेदय व्यक्त केला आहे.

कर्मचाऱ्यांना राेखण्यासाठी जास्त वेतन, सवलती
कुशल लोकांची अनुपलब्धता मागणी व पुरवठा यात समस्या निर्माण करत आहे. कंपन्या अधिक पगार देऊन योग्य लोकांची भरती करत आहेत, तर वरिष्ठांना कायम ठेवण्यासाठी वेतनातही वाढ केली जात आहे. एचसीएल टेकने ३००० वरिष्ठ कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी कंपनीत मालकी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...