बचतीला कात्री:3 वर्षांत एफडीमध्ये जेवढे व्याज कमावले होते, त्यापेक्षा जास्त तर महागाईमुळे गमावले
नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
- जपानमध्ये एफडीवरील व्याजदर शून्य. अमेरिका, चीन आणि जर्मनी 1% पेक्षा कमी, तर भारतात 4.4%.
- अर्जेंटिनामध्ये ते सर्वाधिक 38% व्याजदर. व्हेनेझुएला (36%) दुसऱ्या आणि झिम्बाब्वे (26%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- 119 देशांमध्ये 4 टक्कयांसह मुदत ठेवींवरील व्याजदराच्या बाबतीत आम्ही 29 व्या स्थानावर.
RBI ने शुक्रवारी द्वि-मासिक आर्थिक निधी जाहीर केला. या मध्ये रेपो रेट 4% आणि रिवर्स रेपो रेट 3.5% स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 22 मे 2020 मध्ये दरात बदल करण्यात आले होते. दरम्यान RBI ने चालु आर्थिक वर्षात 5.7% आणि GDPवाढीचा दर 7.2% असण्याचा अंदाज वर्तवला आहे. आकडे हे सांगतात की, तीन वर्षात महागाईचा दर(2019 मध्ये 6.1% आणि 2021 मध्ये 5.5%) 16.5% वाढला आहे. तर एफडीवरील व्याज (2019 मध्ये 6.4%, 2020 मध्ये 5.5%, 2021 मध्ये 4.4%) वाढला आहे. तर 16.3% तोटा झाला आहे.
- जगातील टॉप मध्ये असलेल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये, जपानचा गृहकर्जाचा व्याजदर सर्वात कमी आहे आणि भारताचा दर जास्त आहे.
- डेन्मार्कमध्ये कर्जाचे व्याज सर्वात कमी -0.45%, नेदरलँड्समध्ये 0.35% आणि पेरू मध्ये 0.59% आहे.
- कर्जावर सर्वाधिक व्याज आकारण्यात भारत 193 देशांमध्ये 37 व्या क्रमांकावर आहे. तसेच गृहकर्जावरील व्याज 6.65% आहे.
- यूएसमध्ये महगाईचा दर 7.87% इतका आहे, चीन आणि जपानमध्ये दर 0.9% आहे, जर्मनीमध्ये दर 5.1% आहे आणि भारतात दर 6.07% आहे.
- जर आपण जागतिक महागाई दराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 193 पैकी 140 देशांमध्ये भारतापेक्षा कमी महागाई दर आहे.
- व्हेनेझुएलातील महागाई जगातील सर्वाधिक 1198% आहे. सुदान 340 टक्कयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.