आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा:मॉर्गन स्टेनलीच्या व्हीपींनी फिल्मी स्टाइलमध्ये चोराला पकडले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील गजबजलेल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मॉर्गन स्टेनलीच्या अधिकाऱ्याने एका चोराला फिल्मी स्टाईलमध्ये पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुधांशू निवसरकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुधांशू ऑटोरिक्षाने आपल्या घरी जात असताना ही घटना घडली. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय सुधांशू निवसरकर हे मॉर्गन स्टेनलीमध्ये उपाध्यक्ष असून चांदिवली येथे राहतात. बुधवारी सायंकाळी त्यांनी गोरेगाव येथील हब मॉल येथून घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा घेतली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) बेसजवळ त्यांचा ऑटो वाहतूक कोंडीत अडकला.

अचानक मोबाईल घेऊन पळून गेला चोर
निवसरकर ऑटोरिक्षात बसले असताना त्यांच्या डाव्या हातात मोबाईल होता. अचानक एका तरुणाने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. निवसरकर लगेच ऑटोतून उतरले आणि त्याच्या मागे धावले. काही मिनिटांतच त्यांनी त्याला पकडले, मात्र चोराने त्यांना जोरात धक्का दिला. निवसरकर यांनी तोल साधत पुन्हा त्याचा पाठलाग सुरू केला.

चोराला पकडेपर्यंत पाठलाग केला
काही मिनिटे पाठलाग केल्यानंतर आरोपी धरपडत खाली पडला आणि निवसरकर यांनी त्याला पकडले. काही वाटसरूही निवसकर यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी चोराला मारहाण केली. निवसरकर यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून फोन जप्त केला.

आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
सागर ठाकूर (३२, रा. साकी विहार रोड, पवई) असे आरोपीचे नाव आहे. ठाकूरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही त्याची पार्श्वभूमी तपासत आहोत.

बातम्या आणखी आहेत...