आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम:1 लाख रुपयांचा 1 शेअर! भारताची टायर बनवणारी कंपनी रचणार इतिहास; देशाचा सर्वात महागडा स्टॉक ठरणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टायर बनवणाऱ्या MRF कंपनीचे शेअर्स इतिहास रचण्याच्या जवळ आहेत. कंपनीच्या एका शेअरची किंमत लवकरच 1 लाख रुपये होणार आहे. येत्या काही दिवसांत MRF चा शेअर 1 लाखांवर पोहोचला, तर तो भारताचा पहिला लखपती शेअर ठरेल. गत 20 वर्षांत हा शेअर 100 पटीने वाढला आहे.

5 मे रोजी म्हणजे शुक्रवारी बाजारात MRF चा शेअर 368 टक्के वाढीसह 98,380 रुपयांवर बंद झाला. शुक्रवार त्यात 3,269.20 रुपयांची वाढ झाली. ही तेजी सोमवारीही कायम राहिली तर एमआरएफच्या एका शेअरची किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल यात शंका नाही.

शेअरची जोरदार उसळी

गत आठवड्याभरात हा शेअर 10.79 टक्क्यांनी वधारला. तर गत महिन्याभरात त्याने 16 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. म्हणजे चालू वर्षात (2023) आतापर्यंत MRF च्या शेअरमध्ये तब्बल 11.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2000 मध्ये, MRF च्या एका शेअरची किंमत 1000 रुपये होती. आता हाच शेअर 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श करण्याच्या जवळ पोहोचला आहे. अर्थात गत 23 वर्षात या शेअरने सुमारे 10,000 टक्क्यांची मोठी झेप घेतली.

23 वर्षात असा वाढला शेअर

MRF च्या शेअर्सवर नजर टाकली असता, 2000 साली एका शेअरची किंमत 1000 च्या आसपास होती. ती 2012 मध्ये 10,000 रुपयांवर पोहोचली. 2014 मध्ये हा शेअर 25,000 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर 2016 मध्ये तो 50,000 रुपयांवर पोहोचला. 2018 मध्ये 75,000 व आता 1 लाख रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. 27 एप्रिल 1993 रोजी MRF च्या एका शेअरची किंमत अवघी 11 रुपये होती. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, MRF च्या शेअर्सची किंमत एवढी झपाट्याने कशी वाढली?

स्टॉक एवढा महाग का झाला?

प्रत्यक्षात यामागील कारण शेअर्सचे विभाजन न करणे हे आहे. एंजल वनच्या मते, MRF ने 1975 पासून केव्हाही त्यांचे शेअर्स विभाजित केले नाहीत. यापूर्वी MRF ने 1970 मध्ये 1:2 व 1975 मध्ये 3:10 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते. MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे.

कंपनीची अशी झाली सुरुवात

MRF ची सुरुवात 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून झाली. 1960 नंतर कंपनीने टायर बनवण्यास सुरुवात केली. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ तब्बल 60,000 कोटी रुपयांची आहे. JK Tyre, CEAT टायर आदी कंपन्या MRF च्या स्पर्धक आहेत. MRF चे भारतात 2500 हून अधिक वितरक आहेत. कंपनी जगभरातील 75 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.

कंपनीची कामगिरी

MRF कंपनीने चौथ्या तिमाहीत उत्कृष्ट निकाल सादर केला. FY23 च्या मार्च तिमाहीत, MRF चा स्टँडअलोन नफा 162 टक्क्यांनी वाढून 410.66 कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीची ऑपरेटिंग कामगिरी मजबूत झाली. त्याच वेळी, कंपनीच्या संचलनातून मिळणारा स्टँडअलोन महसूल वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 5,725.4 कोटींवर पोहोचला. दरम्यान, कंपनीने प्रति शेअर 169 रुपये लाभांश जाहीर केला आहे.