आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:एमएसएमई सोलार प्रकल्पासाठी 3.50 कोटींपर्यंत कर्ज घेऊ शकतात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडबीच्या ‘स्टार’ उपक्रमांतर्गत कारखान्याच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यासाठी मुदत-कर्ज देते. हे एमएसएमईंना त्यांचे वीज बिल कमी करण्यास मदत करते. या उपक्रमाचा सर्वात चांगला भाग म्हणजे प्रवर्तकाला स्वतःच्या वतीने कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही.

स्टार उपक्रमाची वैशिष्ट्ये
- प्रकल्पाच्या संपूर्ण खर्चाइतके १०० % वित्त.
- कर्जाच्या रकमेच्या १५-२५% पर्यंत मुदत ठेव.
- पतहमी सुरक्षा सुविधा, साेपी कागदपत्र प्रक्रिया
- पुरवठादाराला कर्जाच्या रकमेचे थेट पेमेंट.

अर्जदाराची पात्रता
- नवीन अर्जदाराचा व्यवसाय किमान ३ वर्षांचा आणि विद्यमान ग्राहकाचा व्यवसाय २ वर्षांचा असावा.
- एमएसएमई २ वर्षांसाठी रोख नफ्यात हवेत. पेमेंट ट्रॅक रेकॉर्ड चांगला असावा.
- प्रस्तावित छतावरील सौर यंत्रणेची उत्पादन क्षमता कनेक्टड लोडपेक्षा जास्त नसावी.

कर्जाची रक्कम, व्याजदर
- स्टार उपक्रमांतर्गत, एमएसएमईंना १० लाख ते ३.५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. त्यावर एमसीएलआरनुसार व्याज आकारले जाते. अंतर्गत रेटिंगच्या आधारे अंतिम व्याजदर निश्चित केला जातो.
- कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी मिळतो. यामध्ये ६-१२ महिन्यांच्या स्थगितीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...