आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट डील:जिओत 9,094 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल अबुधाबीची मुबादला, 1.85 टक्के हिस्सा खरेदी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • रिलायन्स जिओला मिळाला दोन महिन्यांत सहावा मोठा गुंतवणूकदार, अद्याप 19% विक्री

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(आरआयएल)ने शुक्रवारी सांगितले की, अबुधाबीची गुंतवणूक कंपनी मुबादला त्यांची फर्म जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १.८५% हिस्सेदारीसाठी ९०९३.६ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. जिओ प्लॅटफॉर्म्सला ६ आठवड्याहून कमी अवधीत ही सहावी गुंतवणूक मिळाली आहे. तिला आतापर्यंत १८.९७% हिस्सेदारीसाठी ८७,६५५.३५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. आरआयएलकडून जारी निवेदनात नमूद केले की, मुबादलाने ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्ू ४.९१ लाख कोटी रु. आणि एंटरप्रायजेस व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रुपयावर आहे. आरआयएलने सांगितले की, गुंतवणुकीच्या माध्यमातून जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये १.८५% हिस्सेदारी मिळेल.

जिओत गुंतवणूक करणारी पहिली बिगर अमेरिकी कंपनी मुबादला

गुंतवणुकीच्या हिशेबाने आरआयएलचा जिओ प्लॅटफॉर्म्स अमेरिकी कंपन्यांत पहिली पसंत झाली आहे. आता मुबादला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी पहिली बिगर अमेरिकी कंपनी झाली आहे. याआधी गुंतवणूक करणारी फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आदी सर्व अमेरिकी कंपन्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...