आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Mukesh Ambani And Jeff Bezos Invest In Rs 50 Lakh Crore Market On Grocery Stores

नॉलेज रिपोर्ट:किराणा दुकानांच्या भरवशावर 50 लाख कोटींच्या बाजारपेठेत अंबानी-बेजोस यांची गुंतवणूक पणाला

धर्मेंद्रसिंह भदोरिया| नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील श्रीमंतांची भारतात खाद्यान्न, किराणा बाजारपेठेत गुंतवणूक
  • जिओमार्ट- आता व्हॉट्सअॅपवर लोकल दुकानदारांना ऑर्डर द्या

जगभरातील सर्व श्रीमंतांची नजर सध्या भारतीय खाद्यान्न आणि किराणा बाजारपेठेवर आहे. गेल्या आठवड्यात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केला, तर दुसरीकडे जिओ आणि फेसबुकचा करार होताच जगातील सर्वात श्रीमंत असलेले जेफ बेजोस यांच्या अॅमेझॉनने स्थानिक दुकानदार जोडण्यासाठी नवी मोहीम सुरू केली. ही कंपनी पूर्वीपासूनच स्थानिक दुकानदारांसाठी अनेक मोठ्या योजना राबवत होती. मेट्रो कॅश अँड केरीनुसार, देशात खाद्यान्न आणि किराणा मालाची बाजारपेठ सुमारे ५० लाख कोटींची (७०० अब्ज डॉलर) आहे. यामुळेच मोठे उद्योगपती याकडे आकर्षित होत आहेत. विशेष म्हणजे अजूनही या बाजारपेठेत छोट्या दुकानदारांचेच वर्चस्व आहे. या बाजारपेठेत सध्या संघटित क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आणि स्थानिक दुकानदारांचा वाटा ९० टक्के आहे. मार्केट रिसर्च फर्म फोरेस्टर रिसर्चनुसार, या वर्षी ऑनलाइन ग्रॉसरी बाजार गेल्या वर्षीच्या तुलनेत ७६ टक्के वाढून सुमारे ३ अब्ज डॉलरवर (२२,५०० कोटी) जाईल.

ई-कॉमर्स कंपन्यांना सल्ला देणारी कंपनी टेक्नोपॅके कन्सल्टिंगचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट अंकुर बिसेन यांच्यानुसार, सध्या विलीनीकरण अणि स्पर्धेबाबत ज्या बातम्या आहेत त्या या क्षेत्राचा छोटा भाग आहे. किराणा व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. या आधुनिक रिटेलर्सना स्थानिक व्यापाऱ्यांचे महत्त्व पटले आहे.

मेट्रो- पीओएस उपलब्ध करून देत ८ लाख दुकानदार जोडले

जर्मन कंपनी मेट्रो कॅश अँड केरी देशात सुमारे २७ होलसेल स्टोअर्स चालवत आहे. येथून ८ लाख छोटे-मोठे दुकानदार मालाची खरेदी करून आपापल्या भागांत किरकोळ विक्री करत आहेत. मेट्रो देशभर आपल्या स्मार्ट किराणा प्रोग्रामनुसार व्यावसायिकांना पीओएस आणि डिजिटल पेमेंट अशा सुविधा देत आहे. दुकानदार अॅपने कॉन्टॅक्टलेस खरेदी-विक्री करू शकतात.

जिओमार्ट- आता व्हॉट्सअॅपवर लोकल दुकानदारांना ऑर्डर द्या

फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ९.९ % भागीदारी खरेदी केली. या करारानंतर ग्राहक जिओमार्ट व व्हॉट्सअॅपने अधिक चांगल्या प्रकारे खरेदी करू शकतील. जिओमार्टवर छोटे दुकानदार नोंदणी करून ऑनलाइन किराणा व इतर माल विकू शकतात. ग्राहक व्हॉट्सअॅपने आपल्या भागातील दुकानदारांना ऑर्डर देऊ शकतील. यात ४८ तासांत दुकानदार डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतात.

अॅमेझॉन- प्रकल्पाशी जोडले गेले ५ हजारांवर दुकानदार

जिओ-फेसबुक कराराच्या दुसऱ्याच दिवशी अॅमेझॉनने लोकल शॉप्स ऑन अॅमेझॉन कार्यक्रम सुरू केला. सहा महिन्यांपासून तो प्रायोगिक स्तरावर होता. यात छोटे दुकानदार आपली उत्पादने अॅमेझॉनवर लिस्ट करत होते. मे २०२० पर्यंत यात ५ हजारांवर दुकानदारांनी नोंदणी केली आहे. यापूर्वीही अॅमेझॉनने छोट्या दुकानदारांसाठी असे अनेक कार्यक्रम चालवले आहेत.

वॉलमार्ट- 27 हजार दुकानदारांशी केला करार

सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या माध्यमातून स्थानिक किराणा दुकानदारांशी करार करत आहे. फ्लिपकार्टचा ७०० शहरांत २७ हजारहून अधिक छोट्या-मोठ्या स्टोअर्सशी करार आहे. फ्लिपकार्टचे चीफ कॉर्पाेरेट ऑफिसर रजनीशकुमार म्हणाले, आम्ही फ्लिपकार्ट क्विकद्वारे ९० मिनिटांत ग्राहकांना डिलिव्हरी देत आहोत. स्थानिक दुकानदारांनाही आता हे सहज शक्य होत आहे.

देशातील छोटे-मोठे दुकानदार अशा प्रकारेही होताहेत डिजिटल

बंगळुरू बेस्ट या स्टार्टअपमध्ये महेंद्रसिंग धोनीसारख्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. खाताबुक अॅप १ कोटीहून अधिक व्यापारी वापरत आहेत. व्यापाऱ्यांना डिजिटल खाते ठेवण्याची सोय हे अॅप देते. १० हजारांहून अधिक शहर-उपनगरांत ते वापरले जात आहे. याच प्रकारे जंबोटेल, रसीदबुक इत्यादी असे अॅप्स आणि प्लॅटफॉर्म देशभरातील छोट्या दुकानदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देत व्यवसायाला डिजिटल रूप देत आहेत.