आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीमुळे एकीकडे देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे, तर दुसरीकडे देशातील भांडवलदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 (Hurun Global Rich List 2021) नुसार, कोरोना काळात भारतात 40 अब्जाधिशांची वाढ झाली आहे. यासोबतच अब्जाधिशांची संख्या 177 वर पोहचली आहे. या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2020 मध्ये 24% वाढ झाली आहे.
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अंबानी 8 व्या नंबरवर
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या या वार्षिक यादीमध्ये भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी 8 व्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार, अंबानीकडे 6.1 लाख कोटी रुपये (83 बिलियन डॉलर) ची संपत्ती आहे. या लिस्टमध्ये मागच्या वर्षी अंबानी 9 व्या स्थानी होते.
देशातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत
शहर | संख्या |
मुंबई | 60 |
नवी दिल्ली | 40 |
बंगळुरू | 22 |
गौतम अडानींच्या संपत्तीत दुपटीने वाढ
या रिपोर्टनुसार गुजरातमधील व्यापारी गौतम अडानी यांच्या संपत्तीत मागील काही वर्षापासून वेगाने वाढ झाली आहे. 2020 मध्ये त्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होऊन 2.34 लाख कोटी (32 बिलियन डॉलर) झाली आहे. यासोबतच जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 45व्या स्थानी आले आहेत. IT कंपनी HCL चे शिव नडार 1.98 लाख कोटी (27 बिलियन डॉलर) संपत्तीसह भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
देशातील टॉप 5 श्रीमंत उद्योगपती
नाम | संपत्ति | दुनिया में स्थान |
मुकेश अंबानी | 6.1 लाख कोटी रुपये | 8वा |
गौतम अडानी अँड फॅमिली | 2.34 लाख कोटी रुपये | 45वा |
शिव नडार अँड फैमिली | 1.94 लाख कोटी रुपये | 58वा |
आर्सेलर मित्तल | 1.40 लाख कोटी रुपये | 104वा |
सायरस पूनावाला | 1.35 लाख कोटी रुपये | 113वा |
जगातील टॉप 5 श्रीमंत उद्योगपती
एलन मस्क | 14.46 लाख कोटी रुपये |
जेफ बेजोस | 13.88 लाख कोटी रुपये |
बर्नार्ड अर्नाल्ट | 8.37 लाख कोटी रुपये |
बिल गेट्स | 8.07 लाख कोटी रुपये |
मार्क जुकरबर्ग | 7.42 लाख कोटी रुपये |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.