आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mukesh Ambani Gautam Adani Net Worth | Gautam Adani Becomes Asia’s 2nd Richest Man With 66.5 Billion Dollars

मुकेश अंबानींना टक्कर देत आहेत अदानी:​​​​​​​आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले गौतम अदानी, यावर्षी 33 अब्ज डॉलरने वाढली संपत्ती

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंफ्रास्ट्रक्चरपासून रिन्यूएबल एनर्जीमध्येही काम करत आहेत गौतम अदानी

अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

सतत पुढे जात आहेत अदानी
ज्या प्रकारे गौतम अदाणी सलग पुढे जात आहेत, अशा वेळी ते मुकेश अंबानी यांना पछाडत पुढेही जाऊ शकतात. या दोघांमधील मालमत्तेत केवळ 10 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. इंफ्रास्ट्रक्चरपासून रिन्यूएबल एनर्जीमध्येही काम करत असलेल्या गौतम अदाणींनी चीनच्या बेवरेजेस येथून फार्मामध्ये काम करत असलेल्या कंपनीचे मालक झौंग शानशान यांना मागे टाकले आहे. शानशान यांची संपत्ती 63.6 अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास अंबानी यावेळी 13 वे श्रीमंत उद्योगपती आहेत तर अदाणी हे 14 व्या क्रमांकावर आहेत.

यावर्षी अंबानींच्या संपत्तीत झाली घट
यावर्षा विषयी बोलायचे झाले तर अंबानींच्या संपत्तीमध्ये 17.5 कोटी डॉलरची घट झाली आहे. तर अदानी यांच्या संपत्तीत 32.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीमध्ये गेल्या एका वर्षापासून जबरदस्त तेजी आली आहे. मे 2020 पासून आतापर्यंत त्यांच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेअर बाजारात चढ-उतार झाला, अदानींच्या कंपनींचे शेअर नेहमीच वर राहतात आणि प्रत्येक आठवड्यात एका नव्या भावाचा विक्रम बनवतात.

अदानींच्या 6 लिस्टेड कंपन्या आहेत
अदानींच्या लिस्टेड 6 कंपन्यांचे मार्केट कॅप एका वर्षात 41.2 टक्के वाढले आहे. याच काळात अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप केवळ 55% वाढले आहे. रिलायन्स ग्रुपचे मार्केट कॅप 13 लाख कोटी रुपये आहे तर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 8.4 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षींविषयी बोलायचे झाले तर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 20 अब्ज डॉलर होते. जे आता 115 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच यामध्ये 6 पटींनी वाढ झाली आहे. रिलायन्स ग्रुपचे मार्केट कॅप याच वेळी 125 अरब डॉलरने वाढून 178 अरब डॉलर झाले आहे.

अदानी टोटल गॅसचे शेअर 1 वर्षात 114 पटींनी वाढले
गेल्या 1 वर्षात अदानी टोटल गॅस शेअर्स 114 पट वाढले आहेत, जे सर्वाधिक वाढणारे शेअर आहेत. अदानी इंटरप्राइजेजचे शेअर 82 पटींनी वाढले आहे, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर 61 पटींनी वाढले आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर 43 पट व अदानी पावरचे शेअर 18 पटीपेक्षा जास्त वाढले आहे. अदानी ग्रुप सध्या बंदर, विमानतळ, ऊर्जा, संसाधने, लॉजिस्टिक, पॅकेज्ड फूड्स, अ‍ॅग्री बिझिनेस, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, गॅस आणि डिफेन्सशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतलेला आहे.

आशियाच्या टॉप 5 श्रीमंतांचे प्रदर्शन कसे होते
आशियातील 5 श्रीमंत लोकांपैकी 3 चीनमधील, 2 भारतातील आहेत. यापैकी केवळ अदानी आणि टेंसेंटचे सीईओ हुआतेंग यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. अंबानी यांची मालमत्ता किरकोळ घटली आहे जी 0.2 अब्ज डॉलर होती. तर शानशान यांचे 14.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. हुआटेंग यांची 4.1 अब्ज डॉलर्स मालमत्ता वाढली आहे. अलिबाब समूहाचे सीईओ जॅक मा यांचे 1.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. पण अदाणींच्या संपत्तीमध्ये एवढी जास्त वाढ झाली, कारण त्यांच्या लिस्टेड 6 कंपन्यांच्या शेअर्सने एका वर्षात 50 टक्क्यांपेक्षा जास्त बढत मिळवली आहे.

दोन कंपन्यांचे शेअरर्स 100 पटींपेक्षा जास्त वाढले
दोन कंपन्यांचे शेअर्स 100 पेक्षा जास्त पटींनी वाढले आहेत. विशेषत: अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स सध्या 1400 रुपयांच्या आसपास व्यापार करत आहेत. यावेळी रिलायन्सचा शेअरही वाढला आहे. अदानीच्या 6 कंपन्यांमध्ये अदानी गॅस जो आहे तो विदेशी कंपनी टोटलसोबत टायअप करुन गॅसचा पुरवठा करते. अदानी ट्रान्समिशन जे आहे ते लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रात आहे. अदानी एन्टरप्राइजेस विमानतळ आणि रियल्टी इतरमध्ये आहे. अदानी पॉवर वीजपुरवठा क्षेत्रात आहे. ग्रीन एनर्जीमध्ये अदानी ग्रीन एनर्जी काम करते.

सामान्य जनतेशी संबंधित कंपन्या
सामान्य जनतेशी संबंधित कंपन्यांविषयी बोलायचे झाले तर, मुख्य म्हणजे अदानी गॅस आणि अदानी पॉवर आहे. हे गॅस पुरवठा ते वीज वितरणापर्यंतचे काम करते जे थेट सामान्य माणसाशी संबंधित आहे. अदानी हे ग्रुप रियल्टीमध्येही जॉइंट व्हेंचरसह काम करते पण ते लक्झरी रेसिडेन्शियलमध्ये काम करते. रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल बोलायचे झाले तर ही सर्वसामान्यांशी संबंधित एक कंपनी आहे. त्यात पेट्रोल डिझेलपासून ते मोबाइल फोन, टेलिकॉम आणि रिटेलपर्यंतचा समावेश आहे. विशेषत: त्याचा जिओ ब्रँड ऑनलाइन वितरणात ई-कॉमर्स आणि टेलिकॉमचा एक स्थापित ब्रँड आहे.

रिटेलमध्ये रिलायन्स रिटेल याचा भारतातील सर्वात मोठा ब्रांड आहे. म्हणजेच टेलीकॉम, रिटेल आणि डिजिटलमध्ये ही सामान्य लोकांशी संबंधीत कंपनी आहे.

बातम्या आणखी आहेत...