आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुकेश अंबानी गेल्या 6 महिन्यांपासून दर तासाला 90 कोटींची कमाई करत आहेत. तेही अशा वेळी जेव्हा कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प आहे. ही माहिती हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. आज आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट-2020 चे नववे एडिशन जारी करण्यात आले. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 1,000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेले श्रीमंत लोक या लिस्टमध्ये सामील होतात.
9 वर्षांपासून अंबानी पहिल्या नंबरवर
या लिस्टमध्ये रिलायंस इंडस्ट्रीज चे चेअरमन मुकेश अंबानी सलग 9 वर्षांपासून टॉप पोझिशनवर आहेत. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 6,58,400 कोटी रुपये आहे. मागच्या 12 महीन्यांपासून त्यांच्या संपत्तीत 73% वाढ झाली आहे. 2020 च्या एडिशनमध्ये 828 भारतीय सामील आहेत.
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी लॉकडाउन काळात, म्हणजेच मार्च ते ऑगस्टदरम्यान दर तासाला 90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या मुकेश अंबानी आशियातील पहिले आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
अंबानी यांच्यानंतर हिंदुजा ब्रदर्स दुसऱ्या स्थानावर
लंडनमधील हिंदुजा ब्रदर्स (एसपी हिंदुजा, आपल्या तीन भावांसोबत) ने 1,43,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत दुसरे स्थान मिळवले आहे. यांची एकूण संपत्ती 1,43,700 कोटी रुपये आहे. लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर 1,41,700 कोटी रुपयांसह एचसीएल (HCL) चे संस्थापक शिव नाडर आहेत. त्यानंतर चौथ्या स्थानावर गौतम अडाणी आणि आणि पाचव्या स्थानावर अजीम प्रेमजी आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.