आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Mukesh Ambani Is Getting Rid Of 22 Billion Debt, While Anil Ambani Is Bankrupt Due To Debt And Is Looking For A Spiritual Path

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानी भावंडांची गोष्ट:मुकेश अंबानी 22 अब्ज डॉलरच्या कर्जातून मुक्त होत आहेत, तर अनिल अंबानी कर्जामुळे दिवाळखोर होऊन अध्यात्माचा मार्ग शोधत आहेत

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात मोठ्या बिझनेस घराण्यात दिड दशकानंतर दोन भावांच्या शत्रुत्वाचा शेवट

आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेस मन मुकेश अंबानी यांनी आपली कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजवर असलेले 22 अब्ज डॉलरचे कर्ज फेडले आहे. तर दुसरीकडे त्यांचा लहान भाऊ आणि रिलायंस एडीएजीचे चेअरमन अनिल अंबानी कर्जात बुडल्यामुळे अखेर दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहेत. अनिल अंबानी यांनी जवळपास आपल्या सर्व कंपन्या विकल्या आहेत, तरीदेखील त्यांच्यावरील कर्ज उतरले नाही. यामुळे ते अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा विचार करत आहेत.

त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे आता कमाईचे कोणतेच साधन उरले नाही. दोन्ही भावांच्या शत्रुत्वाचा हा आता अंतिम धडा आहे. हा इतिहासात नोंद होणारा सीन आहे.

माझी नेटवर्थ झिरो आहे- अनिल अंबानी

अनिल अंबानी गुरुवारी 61 वर्षांचे झाले. 2008 मध्ये ते 42 अब्ज डॉलरसोबत जगातील बिलिनेयर क्लबमध्ये सामील होते. परंतू, 2019 सप्टेंबरपर्यंत अनिल अंबानी यांच्यावर 12.40 अब्ज डॉलरचे कर्ज झाले. अनिल अंबानी यांनी मागच्या आठवड्यात यूके कोर्टात सांगितले की, सध्या त्यांची नेटवर्थ झिरो आहे. दरम्यान, 2018 मध्ये मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 43 अब्ज डॉलर होती, ती या वर्षी 56.5 अब्ज डॉलर आहे.

बुधवारी राइट्स इश्यू यशस्वी, शुक्रवारी अखेरची कमाई एकत्रित केली

अनेक प्रायवेट इक्विटी आणि इतर मार्गांनी रिलायंस इंडस्ट्रीजचे कर्ज डिसेंबरपर्यंत फेडले जाईल. बुधवारी राइट्स इश्यूमधून 53,125 कोटी रुपयांसोबत कर्ज फेडण्यासाठी जमा केलेल्या पैशानंतर शु्क्रवारी अंतिम डील झाली. दुबईच्या मुबाडलाने जिओमध्ये 9,093 कोटी रुपयात 1.85 टक्के भागीदारी विकत घेतली. हे खरे आहे की, कोरोना महामारीच्या काळात इतर अनेक कंपन्यांप्रमाणे रिलायंसच्या स्टॉकलाही घाटा झाला. विशेष करुन ऑइलच्या किमती कमी झाल्यामुळे. पण, हेदेखील खरे आहे की, मागील काही दिवसात याच्या स्टॉकला झालेल्या नुकसानीची रिकव्हरी झाली आहे. याचे कारण म्हणजे फेसबूकने 5.7 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतलेले शेअर्स.

बदलत्या वेळेनुसार स्वतःही बदलले आहेत मुकेश अंबानी

आपल्या नशीबाच्या जोरावर आता यशाचे नवे पान मुकेश लिहीत आहेत. आधी ते मीडिया आणि फोटोग्राफर्सपासून दूर राहायचे आणि क्वचितच मुलाखती द्यायचे. पण, आता ते खूप बदलले आहेत. फक्त मीडियाच नाही, तर स्वतःच्या इवेंट्समध्ये ते मोठ्या प्रमाणावर आपल्या बिझनेसला प्रमोट करत आहेत. इतकच नाही, तर वर्ल्ड इकोनॉमिक फोरम किंवा दावोससारख्या आंतरराष्ट्रीय संमेलनातही नियमित पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतात. मुंबईच्या हाय सोसाइटीमध्ये मुकेशच नाही, तर त्यांची पत्नी नीता अंबानीदेखील खूप सक्रीय झाली आहे. कोव्हिड-19 च्या संक्रमणापूर्वीपर्यंत मुकेश अंबानी यांच्या 27 मजिली अंटीलियामध्ये नेहमी कोणता ना कोणता कार्यक्रम असायचा.

शारीरिकदृष्ट्या निरोगी अनिल आता धार्मिक होत आहे

अनिल, मुकेश यांच्या विरुद्ध आहेत. फिटनेसची आवड असलेले अनिल शारीरिकदृष्ट्या निरोगी आहेत. सकाळी ते 10 किलोमीटर पळायला जातात. त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, सध्या अनिल जास्त धार्मिक झाले आहेत आणि आपल्या आईसोबत अनेक मंदिरात पाया पडण्यासाठी जात आहेत. अनिल आपल्या मित्रांना सांगतात की, मित्रांना सांगते की आध्यात्मिक प्रगतीच्या तुलनेत भौतिक यश पोकळ आहे.

कमबॅकसाठी आताही 14 तास काम करत आहेत अनिल

अनिल आताही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी ते 14-14 तास काम करुन आपल्या कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, अनिल यांना दिवाळखोर घोषित करुन नवीन सुरुवात करण्यासा सल्ला देण्यात ला आहे. पण त्यांनी यासाठी नकार दिला आहे आणि कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत.

एक डझनपेक्षा जास्त कर्जदार अनिल यांच्या मागे आहेत

अनिल यांच्या कंपन्यांपैकी एक डिफेंस कांट्रेक्टरदेखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. 1 सप्टेंबर रोजी झालेल्या भागधारकांच्या बैठकीत एका वकिलाने म्हटले की, अनिल यांच्या व्यवसायात पैसे टाकून आपण सर्व काही गमावले. ते हेदेखील म्हणाले की, याविरोधात ते एक लॉ-सूट फाइल करण्याच्या विचारात आहेत. आजकाल एक डझनपेक्षा जास्त लोक अनिल यांच्या मागे आहेत. त्यातील एक चीनी बँकांचा समुह आहे, ज्यांनी 2012 मध्ये रिलायंस कम्युनिकेशंसला आपल्या एक नवीन नेटवर्कच्या निर्माणासाठी 925 मिलियन डॉलर उधार दिले होते. या बँकांनी काही दिवसांपूर्वी अनिल यांच्याविरोधात लंडनमध्ये हे सांगून खटला दाखल केला की, अनिल यांनी वयक्तिक गॅरेंटी दिली होती.

कधीच वयक्तिक गॅरेंटी दिली नाही- अनिल अंबानी

फेब्रुवारीच्या सुनावनीमध्ये अनिल यांनी सांगितले की, त्यांनी कधीच वयक्तिक गॅरेंटी दिली नाही आणि त्यांच्याकडे बँकांना देण्यासाठी काहीच नाही. त्यांनी म्हटले की, त्यांच्याकडे सध्या 90 लाख डॉलरची संपत्ती आहे, ज्याला 30 कोटी डॉलरपेक्षा जास्तीच्या कर्जाविरोधात निश्चित करण्यात आले. जज डेविड वाक्समैनने यांनी संशय व्यक्त केला की, अनिल यांच्याकडे पैसे नाहीत. वाक्समैन म्हणाले, "एक खासगी जेट, एक जहाज आणि एक 11 कार असलेली मोटर पूल पाहता, त्यांना वाटत नाही की, अनिल फ्रँक आहेत. याशिवाय जज म्हणाले की, मुकेश यांच्याकडून जास्त मदतीची आशा होती. कोर्टात वाचलेल्या निवेदनात अनिल यांनी यावर मतभेद व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, भावाकडून परत-परत मदत मिळू शकत नाही. ते म्हणाले की, तपासून पाहिले आहे, माझ्याकडे इतर सोर्समधून पैसे भेटू शकत नाहीत.

वेगळे झाल्यानंतर अंबानी कुटुंबात सर्वात मोठे आयोजन

मागच्या वर्षी मार्चमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची श्लोका मेहतासोबत झालेले लग्न भव्य-दिव्य असे होते. हे एक असे लग्न होते,ज्याला मोठ-मोठे पंडित नेहमी लक्षात ठेवतील. लग्नाच्या विधींची सुरुवात स्विस एल्पमध्ये झाली, ज्यात देश-विदेशातील निवडक पाहुणे आपल्या खासगी जेटमधून सेंट मोर्टिजला पोहचले. यानंतर सर्व पाहुणे मुंबईला आले आणि तीन दिवस ग्रँड रिसेप्शन चालले. यात अंबानी कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी येऊन वधु-वरास आशीर्वाद दिला होता.

लग्नावर अब्जो रुपयांचा खर्च

लग्न इतके मोठे होते की, यावर अब्जो डॉलरचा खर्च करण्यात आला. मुकेश अंबानीसारख्या धनाढ्य व्यक्तीसाठी हा पॉकेट खर्चासारखा आहे. मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. त्यांची कंपनी ऑइल रिफायनरी, केमिकल प्लांट, सुपर मार्केट  आणि आशियातील सर्वात मोठ्या मोबाइल नेटवर्क जिओला कंट्रोल करते. ब्लूमबर्गच्या इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांची वयक्तिक संपत्ती 53 अब्ज डॉलर आहे. यामुळे ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर मुकेश अंबानी यांच्यावर सर्वात पॉवरफुल व्यक्ती असल्याचा टॅग लावला, तर चुकीचा ठरणार नाही.

जगातील भावांच्या सर्वात मोठ्या लढाईत झाला मुकेश यांचा विजय

लग्नाची सुरुवात झाल्यावर, मुकेश यांचे लहान भाऊ अनिल अंबानी पाहुण्यांच्या स्वागतासाठी लग्नात आले. पूर्ण आत्मविश्वासाने धाकट्या भावाने कौटुंबिक कर्तव्य बजावले. अनिल अंबानी यांनी आकाशला लग्नाच्या वेळी आणि इतर कामांमध्ये कसे वागावे याबद्दल काही टिप्स दिल्या. हे लग्न अशावेळी झाले, जेव्हा दहा दिवसानंतर अनिल अंबानी यांना खटला हरल्यानंतर 80 मिलियन डॉलरचे कर्ज फेडण्याचा आदेस दिला होता. जर त्यांनी वेळेवर कर्ज फेडले नसते, तर त्यांना तुरुंगातही जावे लागले असते.

व्यवसायाचे साम्राज्य वेगळे करून दोन्ही भाऊ व्यवसायीक शत्रू बनले

या दोन भावांमधील अखेरच्या मिनिटाला झालेले संभाषण भारतीय व्यवसाय जगाच्या इतिहासात विखुरलेला आणि कुटूंबापासून सुटलेला म्हणून लक्षात ठेवला जाईल. अंबानी भावंडांनी आपल्या करिअरची सुरुवात सोबत केली. परंतू, धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावात वाद निर्माण झाला. आधी त्यांनी आपले व्यवसाय वाटून घेतले आणि नंतर एकमेकांचे व्यवसायीक शत्रू बनले. तेव्हापासून त्या दोघांमधील शत्रुत्व भारतीय अर्थव्यवस्थेतील कधी न विसणारा अध्या बनला.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून मुकेश मोठे होत गेले

हिंदू राष्ट्रवादाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून मुकेश यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. आणि इतर व्यवसायिक, यात अनिल अंबानीदेखील सामील होते, यांच्या संपत्तीत घट होत गेली. याबाबत अनिल, मुकेश आणि त्यांच्या कंपनींना विचारणा करण्यात आली, तेव्हा कोणीच उत्तर दिले नाही. कोर्टाची तारीख जवळ येत असताना दोन्ही भावांमध्ये एकमत झालेच नाही.

बातम्या आणखी आहेत...