आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या नेटवर्थमध्ये मोठी घट:शेअर्स कोसळल्याने ₹4,95,28,20,00,000 गमावले, श्रीमंतांच्या यादीत झाली घसरगुंडी

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत 2 महिन्यांपासून व्यावसायिक जगतात गौतम अदानी अन् अदानी ग्रुपचीच चर्चा सुरू आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या संपत्तीत निम्म्याहून अधिक घट झाली. अदानीचे समभाग 85 टक्क्यांपर्यंत घसरले. त्यानंतर आता शेअर बाजारातील चढउताराचा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही मोठा फटका बसला आहे. गत काही दिवसांपासून रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. याचा थेट परिणाम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर झाला आहे.

मुकेश अंबानींनी गमावली एवढी संपत्ती

शेअर्सच्या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची 13 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. श्रीमंतांच्या या यादीत आतापर्यंत 8 व्या क्रमांकावर असलेले अंबानी थेट 13 व्या क्रमांकावर घसरलेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती 85 अब्ज डॉलर्सवरून 79.3 अब्ज डॉलर्सवर घसरली आहे. शुक्रवारी त्यांच्या संपत्तीत तब्बल 579 दशलक्ष डॉलर्सची घट झाली. यामुळे मागील 5 दिवसांत ते 8 व्या क्रमांकावरून 13 व्या क्रमांकावर फेकल्या गेलेत. त्याच्या एकूण संपत्तीत सुमारे 6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4,95,28,20,00,000 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे नुकसान सोसणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती 48.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्समध्ये ते 37 व्या क्रमांकावरून 24 व्या क्रमांकावर पोहोचलेत.

मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट का झाली?

रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने मुकेश अंबानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्सच्या समभागांनी अलीकडेच 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. रिलायन्सचा शेअर 2202.20 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला होता. रिलायन्सच्या शेअर्समध्ये वर्षभरात 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटींवर घसरले आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे तसेच जिओच्या स्वस्त प्लॅनच्या सक्तीमुळे कंपनीच्या प्रतिग्राहक रेव्हेन्यूवर मोठा दबाव आला आहे. याचा फटकाही कंपनीच्या शेअर्सना बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...