आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशाच्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) मार्केटमध्ये एक नवीन ब्रँड आणला आहे. FMCG मार्केट आधीच जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आता या बाजारात अंबानींच्या रिलायन्स रिटेलने 'इंडिपेंडन्स' नावाचा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.
'इंडिपेंडन्स' ब्रँड डाळ-तांदळापासून ते तेलापर्यंत अनेक पाकिटबंद उत्पादनांची विक्री करेल
रिलायन्स रिटेल आपल्या इन-हाउस 'इंडिपेंडन्स' ब्रँड अंतर्गत, गव्हाचे पीठ, क्रिस्टल साखर, बेसन, तूर डाळ ते ब्रँडेड तांदूळ, बिस्किटे, तेल आणि मिनरल वॉटर यासारख्या पॅकेज केलेल्या किराणा उत्पादनांची विक्री करेल. रिलायन्स रिटेलने गुजरातच्या बाजारपेठेतून 'इंडिपेंडन्स' ब्रँड लॉन्च केला आहे आणि अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत.
रिलायन्सच्या पावलात जवळपास सर्व प्रमुख F&B श्रेणींचा समावेश आहे. गुजरातनंतर लवकरच हा ब्रँड देशातील इतर राज्यांमध्येही लॉन्च केला जाणार आहे. रिलायन्स या ब्रँडसह एफएमसीजी मार्केटमध्ये आयटीसी, टाटा ग्रुप, अदानी विल्मर, पतंजली फूड्स आणि ब्रिटानिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करेल.
FMCG ब्रँड इंडिपेंडन्स लॉन्च करताना आनंद होत आहे: ईशा अंबानी
'इंडिपेंडन्स' ब्रँड लॉन्च करताना, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, 'आमचा FMCG ब्रँड इंडिपेंडन्स लॉन्च करताना मला खूप आनंद होत आहे. जो तेल, कडधान्ये, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड्स आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये उज्च दर्जा आणि किफायतशील उत्पादनांचा एक मोठा पर्याय उपलब्ध करतो.'
ईशा अंबानी पुढे पुढे म्हणाल्या, 'वास्तविक भारतीय समस्यांवरील खरा भारतीय उपाय म्हणून हा ब्रँड उभा राहिला आहे. ज्याच्या प्रत्येक कणात भारताचे रुप आहे. यात तुम्हाला भावनिक ओलावा आणि भारतीत्वाची भावना दिसेल.'
RRVL भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रिटेलर
पॅकेज्ड F&B ब्रँड 'इंडिपेंडन्स'ची मालकी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकडे आहे, जो अंबानींच्या ग्राहक व्यवसाय 'रिलायन्स रिटेल व्हेंचर्स' (RRVL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
नव्याने सुरू झालेल्या FMCG व्यवसायाव्यतिरिक्त, RRVL समूह किरकोळ व्यवसाय देखील चालवतो. 16,500 पेक्षा जास्त आऊटलेट्स, 2 दशलक्ष व्यापारी आणि 200,000 कोटींच्या वार्षिक उलाढालीसह RRVL भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी रिटेलर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.