आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होणार अंबानींचा वारसदार?:मुला-मुलींमध्ये वारसा हक्कावरून वाद होऊ नये यासाठी जगभरातील अब्जाधीशांच्या प्लॅनिंगचा अभ्यास करत आहेत मुकेश अंबानी

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया खंडातील सर्वात धनाढ्य उद्योजक मुकेश आपल्या संपत्ती आणि उद्योगाचा वारसा सोपविण्यासाठी एका मजबूत योजनेवर काम करत आहेत. पुढे जाऊन मुली-मुलांमध्ये संपत्तीवरून भांडणे होऊ नयेत या दृष्टीकोनातून ते प्लॅन करत आहेत.

धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी बंधूंमध्ये झालेला वाद साऱ्या जगाने पाहिला. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आता मुकेश अंबानींना घ्यावी लागेल. त्यामुळेच, रिलायंस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी जगभरातील अब्जाधीशांनी आपल्या संपत्तीची वाटणी कशी केली आणि वारसा कसा सोपविला याचा अभ्यास करत आहेत.

64 वर्षीय मुकेश अंबानी यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. या तिघांमध्ये ते आपले 208 अब्ज अमेरिकन डॉरलचे बिझनेस वाटून देणार आहेत. यासाठी ते जगभरातील उद्योजकांचा अभ्यास करत आहेत. वॉल्टन आणि कोच यांनी आपल्या कुटुंबाला वारसा कसा सोपविला हे समजून घेत आहेत.

मुकेश अंबानींचे दोन आवडते पर्याय

1. वॉलमार्टचे वॉल्टन यांचा प्लॅन

1992 मध्ये वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बिझनेस ट्रांसफर करण्यासाठी व्यवस्थापन करण्यात आले होते. जगातील सर्वात धनाढ्य कुटुंब वॉल्टन यांनी 1988 पासूनच आपले दैनंदिन व्यवसाय व्यवस्थापकांच्या हाती सुपूर्द केले होते. यानंतर त्यावर नजर ठेवण्यासाठी एका संचालक मंडळाची स्थापना केली होती. सॅम यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र रॉब वॉल्टन आणि त्यांचे पुतणे स्टुअर्ट वॉल्टन वॉलमार्टच्या या मंडळात समाविष्ट करण्यात आले.

2015 मध्ये सॅम यांचे नात-जावई ग्रेग पॅनर यांना कंपनीच्या चेअरमन पदी नियुक्त करण्यात आले. या निर्णयावर खूप टीका झाली. कारण, शेअरहोल्डर्सची कुटुंबातील सदस्यांनाच अधिक पसंती होती. सॅम यांनी आपल्या मृत्यूच्याही 40 वर्षांपूर्वी 1953 मध्ये आपले वारसदार निवडण्याच्या प्रक्रियेवर कामकाज सुरू केले होते. त्यानुसार, बिझनेसचा 80% भाग 4 मुलांमध्ये वाटून देण्यात आला होता.

2. होल्डिंग ट्रस्टमध्ये टाकणे

मुकेश अंबानी आपल्या कुटुंबाची होल्डिंग एका ट्रस्टमध्ये टाकू इच्छित आहेत. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजला नियंत्रित केले जाईल. या नवीन ट्रस्टमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांच्या मुली-मुलांचा वाटा राहील. या ट्रस्टच्या मंडळाचे ते सगळेच सदस्य राहतील. या योजनेनुसार बोर्डामध्ये अंबानी कुटुंबातील सर्वात जवळच्या सदस्यांना देखील समाविष्ट करून घेतले जाईल. यानंतर रिलायंस कंपनी एका प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या माध्यमातून चालवली जाणार आहे.

रिलायंसचा व्यवसाय रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉमसह रीटेल आणि ई-कॉमर्समध्ये आहे. या मॅनेजमेंटच्या माध्यमातून रिलायंससह इतर कारभार सुद्धा नियंत्रित केले जातील.

मुकेश अंबानी अजूनही पूर्णपणे सक्रीय

मुकेश अंबानी अजूनही पूर्णपणे सक्रीय राहून उद्योग पाहत आहेत. त्यांच्यासोबत एक मुलगी आणि दोन मुले सुद्धा बिझनेसमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी हे तिघे रिलायंस समूहाच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये प्रेझेंटेशन करताना दिसून येतात.

मुकेश आणि अनिल अंबानी यांचा संपत्तीचा वाद

धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी बंधूंमध्ये झालेला संपत्तीचा वाद देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट वाद होता. धीरुभाई अंबानी यांनी आपल्या निधनानंतर कोणत्या मुलाला वारसा कशा पद्धतीने सोपविला जाईल याची योजना आखलेली नव्हती. 2002 मध्ये त्यांच्या निधनानंतर अंबानी बंधूंमध्ये वाद झाला आणि रिलायंसचे दोन तुकडे करण्यात आले.

मुकेश अंबानींना मोठ्या तर अनिल अंबानींच्या वाट्याला छोट्या कंपन्या

अनिल अंबानी यांच्या वाट्यात कम्युनिकेशन, पॉवर आणि कॅपिटल बिझनेस आले. तर मुकेश अंबानी यांना सर्वात महत्वाची अशी रिलायंस इंडस्ट्रीज मिळाली. यानंतर मुकेश अंबानींनी सुद्धा टेलिकॉम आणि रीटेल बिझनेस सुरू केले. रिलायंस कम्युनिकेशन्स मिळवूनही अनिल अंबानी काही विशेष करू शकले नाही. त्याउलट मुकेश अंबानी यांनी जिओ टेलिकॉम उभारून त्याला देशातील नंबर एकची मोबाईल नेटवर्क कंपनी बनवले. जिओची आजची बाजारातील किंमत 6 लाख कोटी रुपये आहेय. तर रिलायंस रीटेलची बाजारातील व्हॅल्यू 5.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात सुद्धा मुकेश अंबानी जायंट किलर ठरले.

अनिल अंबानींचे बिझनेस उद्ध्वस्थ, आध्यात्माच्या मार्गावर

अनिल अंबानी यांचे बिझनेस दिवाळखोरीला लागले. त्यांच्या कंपन्या विकल्या जात आहेत. त्या वाचवण्यामध्ये ते लागलेले आहेत. त्यांचे मुंबईतील मुख्यालय सुद्धा येस बँकेने ताब्यात घेतले आहे. या बँकेकडून घेतलेले कर्ज ते फेडू शकलेले नाहीत. 63 वर्षीय अनिल अंबानी आजही 14 ते 16 तास काम करत आहेत. बिझनेसमध्ये आलेल्या अपयशाने ते आध्यात्माच्या मार्गाला लागले आहेत. याउलट मुकेश अंबानी आज 95 अब्ज अमेरिकन डॉलरच्या संपत्तीसह जगातील 11 व्या क्रमांकाचे धनकुबेर आहेत.

80-90 च्या दशकात होती भरारी

धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वात 80 आणि 90 चे दशक रिलायंससाठी महत्वाचे ठरले. याच काळात रिलायंसने गगनभरारी घेतली होती. परंतु, अनिल आणि मुकेश अंबानी यांच्यात झालेल्या वादाचा कंपनीला फटका बसला. 2004 मध्ये अंबानी बंधूंचा वाद विकोपाला पोहोचला होता. त्यावेळी आई कोकीलाबेन यांनी दोघांना समजावून त्यांच्यात चर्चा घडवून आणली. अंबानी बंधूंचा वाद 5 वर्षे सुरूच होता. परंतु, हळू-हळू दुरावे मिटले. नुकतेच अनिल अंबानी संकटात सापडले होते त्यावेळी मुकेश अंबानी आपल्या भावाच्या मदतीला धावून आले. त्यांना मदत करून तुरुंगात जाण्यापासून वाचवले. अनिल अंबानी सुद्धा मुकेश अंबानींच्या मुलांच्या लग्नात सहकुटुंब उपस्थित होते.

सध्या मुकेश अंबानी बिझनेस आणि सक्सेशन असे दोन्ही प्लॅन तयार करत आहेत. ग्रीन एनर्जीमध्ये मोठी उलाढाल करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी रिलायंसचे अनेक सेक्टर मजबूत केले आहेत. आता वारसदार ठरवताना त्यांना कोणतीही चूक अपेक्षित नाही.

बातम्या आणखी आहेत...