आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता लोक मल्टी इअर इन्शुरन्स म्हणजे एकाच वेळी अनेक वर्षांसाठी विमा घेत आहेत. जानेवारी– मार्च तिमाहीत देशात मल्टी इअर इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या ऑक्टोबर- डिसेंबर २०२२ तिमाहीच्या तुलनेत अडीच पटपेक्षा (१८३%) वाढली. डिसेंबर तिमाहीत एकूण आरोग्य विम्याच्या विक्रीत मल्टी इअर पॉलिसीचा वाटा २४% होता, तो मार्च तिमाहीत वाढून ६८% झाला. म्हणजे ३ तिमाहीच्या जास्त आरोग्य विमा ग्राहकांनी मल्टी इअर पॉलिसी घेतली. देशात सुमारे ४२% ग्राहक असे आहेत जे ३ वर्षाचा आरोग्य विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. आरोग्य विमा ग्राहकांच्या बदलत्या गरजा जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य दिनी विमा प्लॅटफॉर्म पॉलिसीबाजार डॉट कॉमच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत ही माहिती समोर आली आहे.
एकाच वेळी अनेक वर्षांचा विमा यासाठी फायदेशीर मल्टी इअर इन्शुरन्समध्ये एकदम रक्कम दिल्याने दरवर्षी वाढणारा प्रीमियम टाळता येऊ शकतो. एकदम दिलेला प्रीमियमला वर्षाच्या हिशेबाने विभागणी करून कलम ८०डी अंतर्गत प्राप्तिकर लाभ. बहुतांशी आरोग्य विमा कंपन्या मल्टी इअर पॉलिसीवर १०-१५% सूटही देतात. काही विमा कंपन्या प्रीमियम भरण्यासाठी ईएमआयची सुविधाही देतात.
५ लाख रुपयांपेक्षा जास्त कव्हर घेणारे ५६% वाढले उपचाराचा खर्च वाढण्याचा आणखी एक प्रभाव आरोग्य विमा कव्हरेजवर दिसत आहे. ५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीत ५६% वाढली. तर ५ लाखापेक्षा कमी कव्हरेज घेणाऱ्यांची संख्या ३६% घटली आहे. जवळपास ६०% ग्राहकांना आपल्या पॉलिसीत वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधा हवी आहे.
टियर-२ शहरांत सर्वाधिक वाढ अहवालानुसार, मार्च तिमाहीत टियर १ शहरांमध्ये आरोग्य विमा पॉलिसीधारकांची संख्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत २४% वाढली. त्या तुलनेत टियर-२ शहरात ४१% आणि टियर-३ शहरात त्यांची संख्या ३७% वाढली. आधीपासून असलेल्या आजारांचे कव्हरेजचा पर्याय घेणाऱ्या ग्राहकांचा वाटाही ८८% वाढला. डिसेंबर तिमाहीत १७% ग्राहकांनी आधीपासून असलेल्या आजारांचे कव्हरेज घेतले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.