आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी रणनीती:बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व्यवसाय इतर देशांत होतोय मर्यादित

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुराष्ट्रीय कंपन्या चालवताना नेहमीच अडचणी येतात. वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये काम करण्याबरोबरच इतर देशांचे कायदे व नियम यांच्याशी समन्वय साधावा लागतो. इकडे, राजकीय तणाव आणि त्यांच्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षणवादी धोरणांमुळे जागतिक व्यवसायासाठी नवीन अडथळे निर्माण झाले आहेत. अमेरिका आपल्या प्रतिस्पर्धी देशांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानातील गुंतवणूक थांबवण्याचा विचार करत आहे. चीनला प्रगत मायक्रोप्रोसेसर आणि चिप बनवणाऱ्या उपकरणांची विक्री आधीच थांबवली आहे. चीनने तैवानवर कारवाई केल्यास अमेरिका आणि चीनमधील व्यापार पूर्णपणे ठप्प होईल.

जागतिकीकरणातून फायदा मिळवणाऱ्या मोठ्या पाश्चात्त्य कंपन्यांसाठी या परिस्थितींनी अवघड प्रश्न निर्माण केले आहेत. सॉफ्टवेअर आणि पेटंट यांसारख्या बाबतीत पाश्चात्त्य कंपन्या चीनवर कमी अवलंबून आहेत. त्या आता एकूणच कमी जागतिक आहेत. ज्या देशात मजुरी आणि कर कमी आहेत किंवा ग्राहक नवीन आहेत अशा प्रत्येक देशात पाश्चात्त्य कंपन्या व्यवसाय उभारतात. २००३-०४ पर्यंत जगातील विदेशी गुंतवणूक जागतिक उत्पादनाच्या ३०% होती. यात पाश्चात्त्य देशांचा वाटा ७८% होता. सरासरी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीच्या डझनभर विदेशी उपकंपन्या होत्या.

गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. अमेरिकन आणि युरोपीय कंपन्यांना चीन आणि नवीन प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हानांचा सामना करावा लागतो. उदा. भारतातील पाच मोठ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी चार चिनी आहेत. गेल्या वर्षी चीन जर्मनीला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कार निर्यातदार देश झाला होता. जपान पहिल्या क्रमांकावर आहे. २०१० नंतर अमेरिकन, युरोपियन कंपन्यांची विदेशी विक्री वार्षिक केवळ २% वाढली आहे. २००० मध्ये ती ८% व १९९० मध्ये १०% होती. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी परदेशात कमी कारखाने उभारले आहेत. अमेरिकन व युरोपियन परकीय गुंतवणूक २०१५ मध्ये ५४ लाख कोटी रु.वरून २०२१ मध्ये १७ लाख कोटी रु.वर आली आहे. २०१० ते २०२१ दरम्यान जागतिक स्तरावरील एफडीआय समभागांत पश्चिमेचा वाटा ७८% वरून ७१% आला होता. आता अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या परदेशात केवळ नऊ उपकंपन्या आहेत. अमेरिका व युरोपातील राजकारणी या ट्रेंडवर खुश आहेत. चीनला मात देण्यासाठी ते देशांतर्गत उत्पादन वाढवत आहेत. जानेवारी महिन्यात अमेरिकेत कारखाने उभारण्यासाठी ८९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. भारतात अनेक मोठ्या कंपन्यांची संशोधन केंद्रे सुरू अॅपल आणि आदिदास भारत, व्हिएतनाम या मित्र राष्ट्रांमध्ये त्यांची उत्पादने बनवत आहेत. कन्सल्टन्सी एव्हरेस्ट ग्रुपचे जिमित अरोरा म्हणतात, बहुराष्ट्रीय कंपन्या व्यवसायाशी संबंधित इतर पैलूंवरही लक्ष केंद्रित करत आहेत. २०१० आणि २०२० दरम्यान अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचा संशोधन आणि विकास खर्च कमी असलेल्या देशांमध्ये दुप्पट केला आहे. बोइंग विमान कंपनी बंगळुरूमध्ये संशोधन आणि विकास सुविधा तयार करत आहे. अल्फाबेट, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांनी शहरात संशोधन आणि विकास केंद्रे सुरू केली आहेत. वॉलमार्ट आणि रोल्स रॉइस केंद्रेही उघडली आहेत.

बातम्या आणखी आहेत...