आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mumbai PMV Electric Car Price 2022 I EaS E Features Specification | Electric Cars

देशातील सर्वात स्वस्त EV कार लॉंच:PMV इलेक्ट्रिकने 4.79 लाख रुपयांत Eas-E सादर केली; सिंगल चार्जमध्ये 200 किमी धावेल

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक PMV इलेक्ट्रिकने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार EaS-E लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 4.79 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी ही किंमत कायम राहणार आहे. ही ई-कार मायक्रो श्रेणीतील आहे. कंपनीने दावा केला की, ती चालवण्यासाठी 75 पैसे प्रति किमी खर्च येणार आहे.

सिंगल चार्ज 200 किलोमीटरची रेंज उपलब्ध
या कारमध्ये 10 Kwh क्षमतेची लिथियम फॉस्फेट बॅटरी वापरली गेली आहे, जी सुमारे 20hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतील आणि ही कार एका चार्जमध्ये 120 ते 200 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड ताशी 70 किलोमीटर असेल.

11 रंगात आहे कार उपलब्ध

यामध्ये 11 कलर ऑप्शन्स दिले आहेत. ब्रिलियंट व्हाइट, डीप ग्रीन, फंकी यलो, मॅजेस्टिक ब्लू, पॅशनेट रेड, पेपी ऑरेंज, प्युअर ब्लॅक, रॉयल बेज, रस्टिक चारकोल, स्पार्कल सिल्व्हर, विंटेज ब्राउन अशा रंगाचा समावेश आहे. तसेच रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिमोट पार्किंग असिस्ट, ओटीए अपडेट्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे अनेक स्मार्ट फीचर्स या कारमध्ये उपलब्ध असतील.

या कारला तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करून, तुम्ही रिमोटद्वारे एअर कंडिशन (AC), हॉर्न, खिडक्या आणि कारचे लाईटवर नियंत्रण ठेवू शकता.

2,000 रुपयांत बुकिंग करता येईल

कंपनीने अधिकृतपणे या छोट्या कारचे प्री-बुकिंग देखील सुरू केले आहे. जे ग्राहक फक्त 2,000 रुपयांमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...