आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क आपल्या टिप्पण्यांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. त्यांच्या नव्या टिप्पणीनंतर जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत बुधवारी १७% ची घसरताना पाहायला मिळाली. मस्क म्हणाले, टेस्लाने पर्यावरणाच्या चिंतेमुळे इलेक्ट्रिक कार विकण्यासाठी बिटकॉइन घेण्याची योजना थंड बस्त्यात टाकली आहे. यानंतर केवळ दोन तासांत एका बिटकॉइनची किंमत ५४,८१९ डॉलरवरून १६.६३% घसरत ४५,७०० डॉलरवर आली. ही गेल्या एक मार्चपासून सर्वात कमी किंमत आहे. भारतीय रुपयाच्या हिशेबाने समजून घेतल्यास या घसरणीत एका बिटकॉइनची किंमत ६.६९ लाख रुपये घटून ३३.५५ लाख रु. राहिली. एक दिवस आधी ४०.२४ लाख रु. होती. मस्क यांच्या ट्वीटनुसार, आम्ही बिटकॉइन मायनिंग व देवाणघेवाणीसाठी जीवाश्म इंधनाच्या वेगाने वाढणाऱ्या वापराबाबत चिंतित आहोत. विशेषत: सर्वाधिक उत्सर्जन करणारा कोळसा. क्रिप्टोकरन्सी एक चांगली कल्पना आहे आणि याचे भविष्यही उज्ज्वल आहे. मात्र, हे पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्याच्या किमतीत नको.
सोन्याच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक : क्यूबन
अमेरिकी उद्योजक मार्क क्यूबन यांनी संपत्ती जमा करण्यासाठी सोन्याच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सीचा उपयोग पर्यावरणपूरक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मस्क यांच्या टिप्पणीबाबत सांगितले की, क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढल्याने सोने सांभाळायच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. क्यूबन बास्केटबॉल टीम डलास मॅवेरिक्सचे मालक आहेत. त्यांची टीम तिकीट व व्यापारासाठी बिटकॉइन व इथर डिजिटल चलनात पेमेंट स्वीकारते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.