आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोन्याच्या कर्जासाठी प्रसिद्ध असलेले मुथूट ग्रुप आर्थिक संस्थेच्या रूपात उभारी घेत आहे. संस्थेने शिक्षण, आदरातिथ्य, मीडिया, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रवेश केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राहुल यांनी मुथूट ग्रुपचे वरिष्ठ जीएम (मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी) अभिनव अय्यर यांच्याशी केलेली चर्चा...
मुथूट ग्रुपची सुरुवात कशी झाली ? मुथूट ग्रुपचा इतिहास ८०० वर्षे जुना आहे. आता याचे नेतृत्व कुटुंबाची १७वी पीढी करत आहे. समूहाची सुरुवात केरळच्या कोयनचेरीमधून झाली. आता आम्ही २० वेगवेगळ्या व्यवसायात उतरलो आहोत. आमचा व्यवसाय प्रामुख्याने आर्थिक विभाग आणि गैर-वित्तीय विभागामध्ये विभागलेला आहे. फायनान्शिअल डिव्हिजन गोल्ड लोन, मनी ट्रान्सफर, परकीय चलन, मौल्यवान धातू, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर, सिक्युरिटीज, पॅन कार्ड इ. दुसरीकडे गैर-आर्थिक विभागात, शिक्षण, आदरातिथ्य, मीडिया, आरोग्य सेवा, वीज निर्मिती, बांधकाम, गृहनिर्माण इत्यादी क्षेत्रात म करत आहोत. आमच्याकडे केरळात सुमारे ३००-३०० बेडचे दोन मोठे रुग्णालय आणि तीन शाळा आहेत. आम्ही नर्सिंग शाळा, कॉलेज आणि अलाइड आरोग्य विज्ञान कॉलेजदेखील चालवतो. मुथूट फायनान्स समुहाची फ्लॅगशिप कंपनी आहे. देशात ५,७५०पेक्षा जास्त ब्राँचचे नेटवर्क आहे. आमचे ३६ हजार कर्मचारी रोज २.५ लाखापेक्षा जास्त ग्राहकानंा सेवा देत आहेत. आतापर्यंत आम्ही ७२ कोटी ग्राहकांना सेवा दिली.
गोल्ड लोनचे व्यावस्थापन कसे करता ? गोल्ड लोन घेणाऱ्या मुथूट फायनान्सच्या ग्राहकांचे सोने आम्ही इतरत्र कुठेही पाठवत नाही. तर ज्या शाखेतून ग्राहक कर्ज घेतो त्याच शाखेत ते सुरक्षित राहते. हे सोने १००% विम्याद्वारे संरक्षित असते. आमच्या शाखांमध्ये सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था आहेत. यामध्ये ओटीपी, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, स्ट्राँग रूम इत्यादींचा समावेश आहे. कर्जाची परतफेड ९० दिवसांत न केल्यास अनेक कंपन्या सोन्याचा लिलाव करण्याची अट ठेवतात, परंतु आम्ही एक वर्षाची मुदत ठेवतो. ग्राहकांना कर्जाची परतफेड करण्यास आणि त्यांचे सोने घेण्यास प्रवृत्त करतो. नुकतेच ग्राहकांसाठी गोल्ड मिलिग्राम रिवॉर्ड्स कार्यक्रम सुरू केला. या लॉयल्टी प्रोग्रामद्वारे, ग्राहक आमच्यासोबत केलेल्या प्रत्येक व्यवहारावर २४ कॅरेट सोने मिळवू शकतात. प्रत्येक तिमाहीत रोमांचक स्पर्धा सुरू केल्या जातात.
गोल्ड लोनविषयी लोकांचा विचार बदलला ? लोकांना आधी सोन्यावर कर्ज मिळते किंवा घेणे कळतच नव्हते. मात्र आता विचार बदलत आहे. आम्ही काही मार्केटिंग अभियानदेखील चालवले. यातुन आम्ही लोकांना सांगितले की, सर्वसामान्य गरजांसाठी, व्यवसायाचा विस्तार, स्टार्टअप सुरू करणे, कच्चा माल-प्लांट-मशिनरी खरेदी करणे, भाडे भरणे इत्यादींसाठीही सुवर्ण कर्ज घेता येते.
अभिनव अय्यर सीनियर जीएम, मुथूट ग्रुप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.