आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारी २०२२ मध्ये देशातील अनेक मोठे म्युच्युअल फंड हे शेअर बाजारात निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी सुमारे ४२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी ४१६ कंपन्यांमध्ये निव्वळ गुंतवणूक केली, तर २९२ कंपन्यांनी निव्वळ विक्री केली. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या ट्रेंडकडे शेअर बाजारात खूप लक्ष दिले जाते. कारण किरकोळ गुंतवणूकदार नंतर त्यांचे अनुसरण करतात. त्यामुळे शेअर बाजारातील ट्रेंड ठरण्याचे हे एक महत्त्वाचे घटक मानले जातात.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये ९६३.०२ कोटी रुपयांच्या समभागांची सर्वाधिक निव्वळ विक्री केली. सर्वात जास्त ५९७१.९० कोटी रुपयांची गुंतवणूक शेफलर इंडियामध्ये झाली. म्युच्युअल फंड कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात अशा सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, ज्यामध्ये यापूर्वी म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक शून्य होती. त्याचवेळी म्युच्युअल फंडाच्या तीन कंपन्यादेखील होत्या. त्याचवेळी तीन कंपन्यांमधून म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांची संपूर्ण गुंतवणूक काढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.