आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mutual Fund Investment Personal Finance Expert Tips; 8 Things To Know Before Investing; News And Live Updates

कामाची गोष्ट:म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमची गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे याचा मागोवा घ्या

म्युच्युअल फंडने गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये याबाबत लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक यामध्ये काही विचार न करता गुंतवणूक करत आहे. परंतु, अशा परिस्थितीत, जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. पर्सनल फायनन्स एक्सपर्ट आणि ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज मठपाल तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि चांगले परतावा मिळवण्यासाठी काही गोष्ट सांगत आहे.

पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवा
गुंतवणूकदाराने आधी गुंतवणूक यादी तयार करावी? या यादीमध्ये किती पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवावे. या प्रक्रियेला असेट अॅलोकेशन असे म्हणतात. सर्व मालमत्ता वर्गांचे योग्य मिश्रण असलेल्या वेगवेगळ्या गुंतवणूकींमध्ये आपले पैसे कसे गुंतवायचे हे ठरवण्याचा मार्ग म्हणजे असेट अॅलोकेशन. असेट अॅलोकेशनचे काही नियम आहेत. या नियमांनुसार, कोणत्या वयात किती पैसे जमा करायचे हे ठरवले जाते. उदाहरणार्थ - जर एखादा गुंतवणूकदार 25 वर्षांचा असेल तर त्याने त्याच्या गुंतवणुकीचा 25% कर्ज साधनांमध्ये आणि उर्वरित भाग इक्विटीमध्ये गुंतवावा. प्रत्येक गुंतवणुकदारांचे नुकसान सहन करण्याची क्षमता वेगळी असते.

जेवढा धोका तेवढा नफा
गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती वेगळी असते ही वास्तविकता आहे. अॅसेट अॅलोकेशन समजून घेण्यासाठी आपल्याला वय, व्यवसाय आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही जेवढे तरुण असाल तेवढे धोकादायक गुंतवणूक तुम्ही करू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल.

योग्य फंड निवडा
योग्य फंड निवडताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे फंड निवडू शकता. यासाठी सर्वप्रथम आपले आर्थिक ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार गुंतवणूक करा. सर्व प्रकारचे फंड गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. परंतु, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला त्या फंडाबाबत थोडीफार माहिती असावी. जेणेकरुन आपल्याला त्यामध्ये नुकसान होणार नाही.

पोर्टफोलिओमध्ये विविधता आवश्यक
पोर्टफोलिओमध्ये अनेक मालमत्ता वर्गांचा समावेश असावा. विविधीकरण तुम्हाला गुंतवणूकीच्या खराब कामगिरीच्या वाईट परिणामांपासून वाचवते. कधीकधी एखादी कंपनी किंवा सेक्टर उर्वरित बाजारापेक्षा वाईट कामगिरी करते. अशा परिस्थितीत, जर तुमचे सर्व पैसे त्यात गुंतवले गेले नाहीत, तर ते तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे.

तुमची गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे याचा मागोवा घ्या
विशेष म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुमची गुंतवणूक कशी याबाबत सतत मागोवा घेत रहा. तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर याचा तुम्हाला नुकसान होऊ शकतो. यासंदर्भात माहिती ठेवण्यासाठी म्युच्युअल फंडचे मासिक आणि त्रैमासिक तथ्य पत्रके आणि त्याच्या कामगिरीची माहिती असलेली वृत्तपत्रे वाचू शकता. या व्यतिरिक्त, म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरही कामगिरीचे आकडे पाहता येतील.

बातम्या आणखी आहेत...