आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mutual Funds Increase Investment In Banks, 40 Schemes Buy BOB, 23 PNB New Shares

Analysis:म्युच्युअल फंड्सनी वाढवली बँकांमध्ये गुंतवणूक, सर्वाधिक 40 स्कीम्सनी बीओबीचे, 23 ने पीएनबीचे नवे शेअर घेतले

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळ कमकुवत कामगिरी करणाऱ्या बँकांच्या शेअर्सनी दोन वर्षांपासून जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे म्युच्युअल फंड्सनी यात गुंतवणूक वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांनी नव्याने सरकारी बँकांचे शेअर्स घेतले. सर्वाधिक बँक ऑफ बडोदा (बीओबी)चे शेअर्सची खरेदी झाली.एस म्युच्युअल फंडच्या आकडेवारीनुसार, ४० म्युच्युअल फंड स्कीम्सनी बँक ऑफ बडोदाचे, २३ स्कीम्सने पंजाब नॅशनल बँकेचे आणि १७ स्कीम्सने एसबीआयचे शेअर्स घेतले. इतर बँकांमध्येही म्युच्युअल फंड्सची खरेदी आणि होल्डिंग वाढली आहे.

स्टेट बँकेत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना सर्वाधिक बँक शेअर नवी खरेदी योजनेत हिस्सेदारी बँक ऑफ बडोदा 40 131 पीएनबी 23 32 एसबीआय 17 346 कॅनरा बँक 16 65 युनियन बँक 15 21 इंडियन बँक 6 30 बँक ऑफ इंडिया 6 6 (नवी खरेदी फंड स्कीम्सच्या, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत गेल्या ६ महिन्यांचे आकडे, स्रोत: एसीईएमएफ)

जोरदार परताव्याने आकर्षण चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत… सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये ६६% पर्यंत वाढ दिसली. निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स सुमारे २१% वाढला. निफ्टी 50 इंडेक्स सुमारे ५% वाढला.

म्हणून वाढले शेअर्स - नेट एनपीए १..%, हे १० वर्षात सर्वात कमी. - टोटल क्रेडिटमध्ये सरकारी बँकांचा वाटा ५६% पेक्षा जास्त. वार्षिक क्रेडिट ग्रोथ १४% पेक्षा जास्त

बातम्या आणखी आहेत...