आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mutual Funds: Investors Fail To Take Full Advantage Of Equity Mutual Fund Returns; News And Live Updates

लाभात घट:इक्विटी म्युच्युअल फंड रिटर्नच्या पूर्ण फायद्यात गुंतवणूकदार ठरले अपयशी; गेल्या 18 वर्षांत इक्विटी फंड्सचा परतावा 18.7 टक्के, गुंतवणूकदारांची कमाई 13.2 टक्के

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परताव्यात फंड कामगिरीशिवाय गुंतवणूकदारांच्या कार्यपद्धतीचा परिणाम होत असतो

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडाच्या उच्च परताव्याचा फायदा उचलण्यात अपयशी ठरत आहेत. २००३ पासून २०२० दरम्यान म्युच्युअल फंडाचा परतावा एसआयपी आणि गुंतवणूकदाराला मिळालेल्या परताव्यापेक्षा जास्त आहे. एका अभ्यासानुसार, म्युच्युअल फंडाने जवळपास १९ टक्के परतावा दिला, मात्र गुंतवणूकदारांचा प्रत्यक्ष परतावा १३ टक्क्यांच्या अासपास आहे. अॅक्सिस एएमसीच्या या संशोधन अहवालानुसार, परतावा प्रकरणात गुंतवणूकदारांच्या व्यवहारावर परिणाम टाकला आहे. ते सर्वसाधारणपणे लहान अवधीचे उद्दिष्ट घेऊन चालतात, फंडाच्या कामगिरीवर विश्वास ठेवतात आणि बाजारातील चढ-उतारावर त्वरित प्रतिक्रिया देतात. या कारणामुळे त्यांचा परतावा फंडाच्या रिटर्नपेक्षा कमी राहतो. अहवालानुसार, इक्विटी आणि हायब्रिड म्युच्युअल फंडात २००३ पासून २०२० दरम्यान इक्विटी फंडाने सर्वात जास्त १८.७ टक्के परतावा दिला. यात पैसा लावणाऱ्या गुंतवणूकदारांचा परतावा १३.२% राहिला. यादरम्यान एसआयपीने (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) १४.५ टक्के परतावा दिला.

समान अवधीत हायब्रिड फंडाने १२.२ टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, त्यांच्या गुंतवणूकदारांचा परतावा ९.३% आणि एसआयपीचा परतावा ११.१% राहिला आहे. अॅक्सिस एएमसी रिसर्चने म्युच्युअल फंडाच्या तीन वेगवेगळ्या श्रेणी- इक्विटी, हायब्रिड (मल्टी अॅसेट) आणि डेट फंडाच्या कामगिरीचा गुंतवणूकदार आणि एसआयपी रिटर्नचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यानुसार, २००९ ते २०२० दरम्यान डेट म्युच्युअल फंडाचा रिटर्न एसआयपीपेक्षा काहीसा कमी, मात्र गुंतवणूकदारांच्या परताव्यापेक्षा थोडा जास्त राहिला. या १२ वर्षांत डेट फंडाने ७.८ टक्के रिटर्न दिला आहे. यामध्ये पैसा लावणाऱ्या गुंतवणूकदारांचा परतावा ७.७% आणि एसआयपीचा रिटर्न ८.१ टक्के राहिला. या अभ्यासाचे महत्त्व यासाठी वाढले की, २०२० मध्ये कोरोना महारोगराईत शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसले.

याआधीही जेव्हा बाजारात मोठी घसरण आली होती तेव्हा गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. हाच कल गेल्या वर्षीही दिसला, विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडात. गेल्या वर्षीच्या सुरुवातीस गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडात बराच पैसा गुंतवला, मात्र २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत त्यांचा दृष्टिकोन बदलला. यामध्ये बाजारात विक्रमी तेजीनंतर करेक्शनची महत्त्वाची भूमिका राहिली. परिणामी एसआयपी बुकमध्ये घसरण आली. ज्यांच्या एसआयपीचा अवधी संपला अशांनी घसरणीमुळे एसआयपीचे नूतनीकरण केले नाही. यामुळे घटतो रिटर्न

फंड, एसआयपी, गुंतवणूकदारांच्या रिटर्नची तुलना

  • गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे लहान अवधीचे उद्दिष्ट ठेवतात.
  • फंडाच्या कामगिरीच्या हिशेबाने गुंतवणुकीचे निर्णय घेतात.
  • बाजारात चढ-उतार वाढल्यावर लवकरच गुंतवणूक कॅश करतात.
  • चक्रवाढीचा फायदा उचलण्यासाठी गुंतवणूक सुरू ठेवत नाहीत.

दीर्घावधीत एसआयपी रोखणे चुकीचा निर्णय
शेअर बाजारात काही अवधीसाठी आलेले करेक्शन पाहता दीर्घावधीची एसआयपी रोखणे योग्य नाही. यामुळे एसआयपीचा उद्देश संपतो. यासोबत पोर्टफोलिओच्या दीर्घावधीच्या उद्दिष्टाचे मोठे नुकसान होते. कारण, यामध्ये गुंतवणूकदार शेअर्सच्या किमतीतील चक्रवाढीच्या (घसरणीच्या टप्प्यात जास्त युनिट अलॉट होतात) ताकदीचा फायदा उचलण्यात मागे पडतात.

बातम्या आणखी आहेत...