आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Naika Company Started With 3 Employees, Today The Largest Beauty Products Platform

ब्रँडच्या यशाची कहाणी:नायका कंपनीची 3 कर्मचाऱ्यांपासून सुरुवात, आज सौंदर्य उत्पादनांचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाय‍का...महिलांच्या सौंदर्य आणि आरोग्य उत्पादनांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ. २ कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या नायकाचे मूल्य आज १ लाख कोटींहून अधिक आहे. २०२० मध्ये नायका ही महिलांनी सुरू केलेली भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. नायकाकडे १२०० हून अधिक ब्रँडची उत्पादने आहेत आणि कंपनीला दरमहा १३ लाखांहून अधिक ऑर्डर मिळतात. नायका हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ स्त्री असा होतो. नायकाची सुरुवात ऑनलाइन शॉपिंग अॅप म्हणून झाली, परंतु कंपनीने त्वरित विस्तार केला. अलीकडेच नायकाचे मुख्य वित्त अधिकारी अरविंद अग्रवाल यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे नायका चर्चेत आहे. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये जाणून घ्या नायकाची कहाणी.

नायका | ई कॉमर्स कंपनी {स्थापना ः २०१२ {उत्पन्न ः ६७ हजार कोटी रुपये

नायकाचा प्रवास 2012 मुंबईत नायकाची स्थापना झाली 2014 दिल्लीमध्ये पहिले िफजिकल स्टोअर सुरू 2015 नायका कॉस्मेटिकची सुरुवात 2016 नायका नॅचरल्सची सुरुवात झाली 2018 नायका मॅन, पुरुषांसाठी वेगळा विभाग 2019 कॅटरिनाची कंपनीत भागीदारी 2020 नायका एक युनिकॉर्न ब्रँड झाला 2021 नायकाने आयपीओ लाँच केला

टाॅकिंग पाॅइंट : कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप Âकॉपीराइट उल्लंघनासाठी लाॅरियलद्वारे नायकावर दावा दाखल केला होता, तो नंतर दोन्ही कंपन्यांनी निकाली काढला. Âनायका हा कौटुंबिक व्यवसाय आहे, फाल्गुनी यांचा मुलगा अंकित हा ई-कॉमर्स व्यवसाय हाताळतो. मुलगी अद्वैता फॅशन व्हर्टिकलची प्रमुख आहे.

सुरुवात : केवळ ८ वर्षांतच एक युनिकॉर्न कंपनी झाली नायका नायकाची सुरुवात २०१२ मध्ये फाल्गुनी नायर यांनी केली होती. त्यांनी नायकाची पायाभरणी केली त्या वेळी त्यांचे वय ५० वर्षे होते. २०१२ मध्ये फाल्गुनी यांनी फक्त ३ लोकांसह नायका सुरू केले. सुरुवातीला कंपनी फक्त ऑनलाइन व्यवसायात सक्रिय होती आणि त्या काळात नायकाला जास्तीत जास्त फक्त ६० ऑर्डर मिळत असत. परंतु २०१४ पासून कंपनीने झेप घेतली. त्याच वर्षी सेकोइया कॅपिटल इंडिया नावाच्या कंपनीने नायकामध्ये १ दशलक्ष डाॅलर गुंतवणूक केली. आज नायकाचे १०५ हून अधिक ऑफलाइन स्टोअर्स आहेत, तिथे २ लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. २०२० मध्ये ८ वर्षांच्या आतच नायका ही युनिकॉर्न कंपनी झाली. आज नायकामध्ये १८ कंपन्यांची गुंतवणूक आहे.

व्यवसाय : ५० लाखांहून अधिक ग्राहक, १०५ फिजिकल स्टोअर्स नायकाचे ५० लाखाहून अधिक सक्रिय मासिक ग्राहक आहेत. तसेच जवळपास १०५ ऑफलाइन स्टोअर्स आहेत. १० वर्षांत नायकाने ६७ हजार कोटींचे मार्केट कॅप तयार केले आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात नायकाला कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. एप्रिल २०२० मध्ये नायकाच्या विक्रीत ७० टक्के घट झाली. पण, त्याचा परिणाम कंपनीवर फार काळ टिकला नाही. आणि आता नायकाने महामारीदरम्यान झालेल्या नुकसानीपैकी ९० टक्के भरून काढले आहे. नायकाने आपला आयपीओ २८ ऑक्टोबर २०२१ ला लाँच केला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीने नायका नॅचरल्स, नायका काॅस्मेटिक्स, के-ब्यूटी आणि नायका फॅशनसारखे अनेक इन-हाउस ब्रँडही तयार केले आहेत.

यशाचा मंत्र : इन्व्हेंटरी मॉडेल हे नायकाचे वैशिष्ट्य नायकाचे इन्व्हेंटरी मॉडेल त्याला त्याच्या स्पर्धकांपेक्षा वेगळे करते. या व्यवसाय मॉडेलअंतर्गत नायका प्रथम ब्रँड किंवा वितरकांकडून स्वतः उत्पादने खरेदी करते आणि नंतर ती आपल्या ग्राहकांना विकते. ऑनलाइन व्यवसायातील बहुतांश कंपन्या मार्केटप्लेस मॉडेलवर काम करतात, तेथे विक्रेते थेट उत्पादने विकतात. इन्व्हेंटरी मॉडेल नायकाला कोणत्याही बनावट वस्तू टाळण्यास मदत करते. याशिवाय आपल्या मार्केटिंगद्वारे नायकाने कतरिना कैफ आणि आलिया भट्टसारख्या सेलिब्रिटींना कंपनीशी जोडले आहे, त्यामुळे कंपनीची विश्वासार्हता आणखी वाढली आहे. कतरिनाने नायकाच्या माध्यमातून ब्यूटी ब्रँड लाँच केला. नंतर तिने नायकामध्ये २२ कोटी रुपये स्वतंत्रपणे गुंतवले. दुसरीकडे आलिया भट्टनेही नायकामध्ये ५४ कोटींची गुंतवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...