आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाऊनच्या ४० दिवसांत डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी केंद्र सरकार दुसऱ्या मदत पॅकेजची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह विविध अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. पंतप्रधानांनी त्यानंतर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्र्यांचीही भेट घेतली. तत्पूर्वी नागरी उड्डयण, कामगार व ऊर्जासह विविध मंत्रालयाच्या बैठका घेतल्या. या बैठकांत देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे कोरोनाच्या आर्थिक परिणामावर उपाय म्हणून केंद्र सरकारने गरीब, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्चअखेरीस १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. देशांत २५ मार्च रोजी लागू लॉकडाऊन १७ पर्यंत वाढवले आहे.
इकडे दोन दिलासे आणि...महिला जनधन खात्यात उद्यापासून ५०० रु. हप्ता
सरकार सोमवारी महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपयांचा दुसरा हप्ता टाकेल. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सरकारने एप्रिलपासून तीन महिन्यांपर्यंत प्रत्येकी ५०० रुपयांची मासिक मदत जाहीर केली होती. अर्थव्यवहार सचिव देवाशिष पांडा यांच्या मते, मेचा हप्ता पाठवण्यात आला आहे. बँकांत गर्दी होऊ नये म्हणून खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार वेगवेगळ्या दिवशी ही रक्कम काढता येईल.
बँकांना कर्ज बुडण्याची भीती, छाेट्या व्यावसायिकांना १००% सरकारी हमीचे कर्ज?
अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी एमएसएमई महत्त्वाचे क्षेत्र आहे. याचा जीडीपी वाटा एक तृतीयांशहून जास्त आहे. हे क्षेत्र ११ कोटी लोकांना रोजगार देते. यात तेजीविना अर्थव्यवस्थेला गती अशक्य आहे. लघुउद्योजकांना १००% सरकारी हमीचे कर्ज देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. दोन बँकर्सनी सांगितले की, हे कर्ज २५ ते १००% पर्यंत हमीचे असेल. मात्र, बँका अशा हमीस तयार नाहीत.
दिलाशासह रेटिंगचीही चिंता, ४.५ लाख कोटींपर्यंत पॅकेजची कमाल मर्यादा?
मदत पॅकेजची कमाल मर्यादा केंद्र निश्चित करू शकते. सार्वभौम पतमानांकन घटण्याच्या शक्यतेने सरकार ४.५ लाख कोटींची मर्यादा निश्चित करू शकते. एका अधिकाऱ्याने म्हटले की आम्ही दक्ष आहोत. आर्थिक कमकुवतपणा दिसला तर भारताच्या सार्वभौम रेटिंगवर दबाव येईल, असा इशारा मंगळवारीच फिचने दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने मोरेटोरियम तीन महिने आणखी वाढवावे : बँका
- अधिकाऱ्यांच्या मते, दुसऱ्या पॅकेजचा आराखडा तयार झाला आहे. यात नोकरी गमावणाऱ्या,छोट्या कंपन्यांना दिलासा मिळेल.
- कंपन्यांना कर कपात सवलती मिळण्याची शक्यता आहे.पॅकेजमध्ये छोटे व्यापारी शेतकरी, स्थलांतरित मजुरांसाठी घोषणा असतील.
- उड्डाण, हॉस्पिटॅबिलिटी,वाहन, रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्स आदी क्षेत्रांना दिलाशासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
- अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिक कारभार सुरळीत झाल्यानंतर या क्षेत्रांसह मोठ्या उद्योगांसाठी घोषणा होतील.
- ४० दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प आहे. यामुळे २.९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- एका अधिकाऱ्याने सांगितले, २.१ लाख कोटी रुपये उभारणीसाठीचा निर्गुंतवणूक कार्यक्रम आता सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
आज देशातील कोरोना योद्ध्यांना सलामी, आकाशातून फुले बरसणार
लष्कर आज कोरोना योद्ध्यांना सलामी देईल. लढाऊ विमाने फ्लाय पास्ट करतील. लष्करी बँड पथक रुग्णालयांत धून वाजवतील. आकाशातून फुले उधळली जातील. लढाऊ जहाजे सजतील... शनिवारी याचा सराव करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.