आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Benefits Of Saving In National Pension Scheme; Financial Planning | Fd Rd | Mutual Fund | Pension Scheme

NPS खाते काय असते, कशी बचत करणार:वाचा- राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बचतीचे फायदे; या खात्यातून एकाचवेळी काढता येईल 60% रक्कम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून बहुतांश लोक नोकरीत असताना आर्थिक नियोजन सुरू करतात. यासाठी ते एफडी, आरडी, म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडतात. भारतात शासकीय नोकरदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. पण खासगी नोकरदार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खासगी नोकरदार बचत, गुंतवणुकीवर भर देत आर्थिक बाजू पक्की करण्याचा प्रयत्न करतात.

वृद्धपणात विशेष सेवानिवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये, कुटुंबातील व्यक्तींवर पैशांसाठी अवलंबून राहण्याची वेळ येवू नये, त्यासाठी सद्या बहुतांश नोकरदार राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत असलेल्या योजनेत अर्थात NPS मध्ये बचत करताना दिसतात. सुरूवातीला ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. पण आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

या योजनेत बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे या योजनेत बचत केल्यास तुम्हाला करातून सुट देखील मिळते. चला तर जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर...

भारतातील नोकरदार वर्गातील लोक 50 ते 65 वर्षादरम्यान निवृत्त होतात. बहुतांश लोक नोकरी दरम्यान सेवानिवृत्तीनंतरचे प्लॅनिंग सुरू करतात. यात आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व दिलं जाते. खरं तर सेवानिवृत्तीनंतर योग्य ठिकाणी बचत करणे गरजेचं असते. सद्या मोठ्या संख्येने लोक राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मध्ये बचत करत आहेत. एनपीएस हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन मानला जातो. सुरुवातीच्या काळात एनपीएस ही केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. पण नंतरच्या काळात ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

या योजनेत दोन प्रकारची अकाउंट तुम्ही सुरू करू शकता

या योजनेत तुम्हाला बचतीसाठी टिअर -1 आणि टिअर -2 असे दोन पर्याय मिळतात. एनपीएसमध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्ती बचत सुरू करू शकतात.

एनपीएस टिअर -1 खाते समजून घ्या

जर तुम्हाला एनपीएसमध्ये बचत सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम टिअर -1 मधील अकाउंट सुरू करावं लागेल. त्यानंतर तुम्ही टिअर -2 अकाउंट सुरू करू शकता. एनपीएस टिअर -1 हे रिटायरमेंटच्या अनुषंगाने तयार केले जाते. तुम्हाला 500 रुपये बचत करून हे अकाउंट सुरू करता येते. रिटायरमेंटनंतर तुम्ही एनपीएसच्या टिअर -1 अकाउंटमधून एकावेळी 60 टक्क्यांपर्यंत रक्कम सहज काढू शकता. उर्वरित 40 टक्के रकमेतून तुम्हाला एन्युटीज खरेदी करावी लागते. एन्युटीची रक्कम तुम्हाला दरमहा पेन्शन स्वरूपात दिली जाते.

एनपीएस टिअर - 2 खाते समजून घ्या

 • एनपीएस टिअर- 2 अकाउंट हे बचत खात्याप्रमाणे असते. हे अकाउंट सुरु करण्यासाठी तुम्ही सुरूवातीला किमान 1000 रुपयांची बचत करावी लागते. या अकाउंटमध्ये तुम्ही केव्हाही कितीही प्रमाणात रक्कम भरू शकता आणि गरजेनुसार रक्कम काढू शकता. आवश्यकता असेल तर तुम्ही एकावेळी सर्व रक्कमदेखील या अकाउंटमधून काढू शकता. टिअर -2 अकाउंटमध्ये तुम्ही एका वर्षात पैसा जमा करण्यास बांधील नसता. मात्र एनपीएस टिअर -1मध्ये तुम्हाला वर्षातून एकदा पैसे जमा करावे लागतात.

दोन्ही खात्यामधील करसवलतीत मोठा फरक

 • टिअर -1 आणि टिअर -2 या दोन्ही अकाउंटमुळे मिळणाऱ्या कर सवलतीत मोठा फरक असतो.
 • टिअर-1 अकाउंट होल्डरला आयकर प्राप्तीकर कायदा 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि 80 CCD (1B) अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो.
 • मात्र एनपीएस टिअर -2अकाउंट होल्डर कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळत नाही.
 • केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एनपीएस टिअर -2 अकाउंटवर कर सवलत मिळते. पण त्यासाठी काही अटी असतात.
 • सरकारी कर्मचाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळण्यासाठी बचतीच्या रकमेवर तीन वर्षांचा लॉकिंग कालावधी असतो.
 • एनपीएस टिअर -1 अकाउंटमधून काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते. मात्र एनपीएस टिअर -2 अकाउंटमधून काढलेली संपूर्ण रक्कम करपात्र असते.
बातम्या आणखी आहेत...