आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीओचा मेळावा:एनबीएफसींनी उभारला 40,000 कोटींचा निधी, आयपीओसाठी करणार कर्ज वितरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात देशातील बँकेतर वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) अत्यंत अल्प कालावधीच्या कमर्शियल पेपर (सीपी) या कर्जाच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या कामाला वेग दिला आहे. वास्तविक नाेव्हेंबर महिन्यात भांडवल बाजारात अनेक आयपीआे येण्याच्या तयारीत आहेत. हे आयपीआे खरेदी करण्यासाठी लाेक बँकेतर वित्तीय कंपन्यांकडून अल्प मुदतीची कर्जे घेतात. कर्ज वितरणासाठी या बँकेतर वित्तीय कंपन्या बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत आहेत.

बँकेतर वित्तीय कंपन्यांनी गेल्या चार दिवसांत ४० हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. बजाज फायनान्स आणि आदित्य बिर्ला फायनान्स निधी उभारण्यात सगळ्यात आघाडीवर आहेत. ब्राेेकरेच कंपन्यांच्या वितरकांच्या म्हणण्यानुसार आता बँकेतर वित्तीय कंपन्या आणखी जास्त निधी उभारतील. तज्ज्ञांच्या मते जेव्हा आयपीआेची मागणी वाढते त्या वेळी कमर्शियल पेपर (सीपी) बाजारात आणले जातात. निधी उभारण्याची ही सर्वात साेपी पद्धत आहे.

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसने आयपीआे- सीपीच्या माध्यमातून निधी उभारला आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक आयपीओमुळे बाजारात येणार असल्याने बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या निधी उभारणीला वेग आला आहे.

सध्या गुंतवणूकदारांची समभागांबाबतची भावना सकारात्मक आहे. या आयपीआेमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या त्यांच्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी बँकेतर वित्तीय कंपन्या आयपीआे-सीपीच्या माध्यमातून निधी गाेळा करतात. त्याला अत्यंत अल्प मुदतीची कर्ज साधने म्हणतात. त्यांचा परिपक्वता कालावधी ८ ते १२ दिवसांचा असतो. यापूर्वी हे पेपर्स ८० ते १२० बेसिस पॉइंट्सच्या आधारावर बाजारात आणले जात हाेते. जे तीन महिन्यांत परिपक्व झालेल्या पेपर्सवर बँकेतर वित्तीय कंपन्यांनी नोंदवलेल्या दरापेक्षा जास्त होते.

नाेव्हेंबरमध्ये येणार ५ कंपन्यांचे इश्यू
तब्बल महिनाभरानंतर प्राथमिक बाजारातील तेजी पुन्हा परतणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स आणि पाॅलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक यासह पाच कंपन्या आयपीआे घेऊन येत आहेत. या आयपीआेच्या माध्यमातून २७ हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उभारले जाईल. या कालावधीत सफायर फूड्स इंडिया, एसजेएस एंटरप्राइझ आणि सिगाची इंडस्ट्रीज या तीन कंपन्यांचेही आयपीआे येणार आहेत. साैंदर्य आणि वेलनेस उत्पादनांची आॅनलाइन बाजारपेठ असलेल्या नायकाचे संचालन करणाऱ्या एफएसएन इ-काॅमर्स व्हेंचर्स लि. आणि फिनाे पेमेंट बँक यांचे आयपीआे बाजारात आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...