आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीएलटीचा निर्णय:अनिल अंबानी यांच्याविरोधात दिवाळखोरीचा खटला चालवण्यास एनसीएलटीची परवानगी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्ट 2016 मध्ये क्रेडिट सुविधे अंतर्ग घेतले होते 1200 कोटी रुपयांचे कर्ज

रिलायंस कम्युनिकेशन (आरकॉम) चे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. आरकॉमसाठी अनिल अंबानी यांनी घेतलेल्या कर्जामुळे आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मुंबई बेंचने अनिल अंबानीविरोधात दिवाळखोरीचा खटला चालवण्यास मंजूरी दिली आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या पर्सनल गॅरेंटीवर आरकॉमसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)कडून 1200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

एसबीआयने ऑगस्ट 2016 मध्ये दिली होती क्रेडिट सुविधा

मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयने अनिल अंबानी यांच्या रिलायंस एडीएजी ग्रुपमधील कंपनी रिलायंस कम्युनिकेशन, रिलायंस टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला क्रेडिट सुविधा दिली होती. या क्रेडिट सुविधे अंतर्गत एसबीआयने 565 कोटी आणि 635 कोटी रुपयांचे दोन कर्ज ऑगस्ट 2016 मध्ये रिलायंस कम्युनिकेशन आणि रिलायंस टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिले होते. सप्टेंबर 2016 मध्ये अनिल अंबानी यांनी यासाठी पर्सनल गॅरेटी दिली होती.

2017 मध्ये डिफॉल्ट झाले होते लोन अकाउंट

जानेवारी 2017 मध्ये आरकॉम आणि रिलायंस टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे लोन अकाउंट डिफॉल्ट झाले. या दोन्ही खात्यांना ऑगस्ट 2016 पासून डिफॉल्ट मानले आहे. जानेवारी 2018 मध्ये एसबीआयने अनिल अंबानी यांच्या पर्सनल गॅरेंटीला रद्द केले. एनसीएलटीने ऑब्जर्व केले की, आरकॉम आणि रिलायंस टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड जानेवारी 2017 पर्यंत रिपेमेंट करू शकले नाही. त्यानंतर या दोन्ही खात्यांना नॉन परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...