आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • NCLT To Hear Today Two Insolvency Petitions Against Cash Strapped Go First Airline

सुनावणी:गो-फर्स्ट विरूद्ध 2 दिवाळखोरी याचिकांवर सुनावणी करेल NCLT;ट्रान्सपोर्ट सेवा प्रदात्यांचे कंपनीकडे 3 कोटी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक समस्येमुळे अडचणीत आलेली गो-फर्स्ट एअरलाइनच्या विरोधात दाखल केलेल्या दोन दिवाळखोरी याचिकांवर सुनावणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) आज सुनावणी करणार आहे. एक याचिका ट्रान्सपोर्ट सेवा प्रदाता SS असोसिएट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने देखील दाखल केली आहे. तर दुसरी याचिका पायलटने दाखल केली आहे. ट्रान्सपोर्ट सेवा प्रदात्याचा दावा आहे की, त्यांच्याकडे एअरलाइनचे सुमारे 3 कोटी रुपये थकित आहेत. त्याचवेळी, पायलटचा दावा आहे की, त्याला एअरलाइनकडून 1 कोटींहून अधिक रक्कम घ्यायची आहे. एअरलाइनवर कर्जदारांचे एकूण 11,463 कोटी रुपये थकीत आहेत. ​​​​​​

एअरलाइनच्या याचिकेवर NCLTने राखून ठेवले आदेश
दुसरीकडे, NCLTने 4 मे रोजी सुनावणी करताना एअरलाइनच्या दिवाळखोरीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. एअरलाइनने एनसीएलटीकडे अंतरिम स्थगिती मागितली आहे. अंतरिम स्थगिती अर्थात कर्जाशी संबंधित प्रकरणामध्ये प्रलंबित असलेली कोणतीही कायदेशीर कार्यवाही रखडलेली मानली जाईल. कर्जदार कोणत्याही कर्जाच्या बाबतीत कायदेशीर कारवाई देखील करू शकत नाहीत. याशिवाय, इंधन पुरवठादारांनी फ्लाइट ऑपरेशन्ससाठी इंधन पुरवठा सुरू ठेवावा आणि विद्यमान करार रद्द करू नयेत, अशी एअरलाइनची यात मागणी आहे.

सर्व उड्डाणे12 मे पर्यंत स्थगित
एअरलाइन्सने प्रथम सांगितले होते की, ते 3, 4 आणि 5 मे साठी त्यांची उड्डाणे रद्द करत आहेत. यानंतर, उड्डाण निलंबन 9 मे आणि नंतर 12 मे पर्यंत वाढविण्यात आले. एअरलाइनने 15 मे पर्यंत सर्व फ्लाइटचे तिकीट बुकिंगही बंद केले आहे. त्याच्याकडे इंधन भरण्यासाठीही पैसे नाहीत. गो-फर्स्टच्या संकेतस्थळानुसार, कंपनीने एकेकाळी 27 देशांतर्गत आणि 8 आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनसाठी दररोज 200 पेक्षा जास्त उड्डाणे चालवली होती.

विमान कंपनी प्रवाशांना तिकीटाचे पैसे करणार परत
डीजीसीएने कठोर भूमिका दाखवत प्रवाशांना उड्डाणे रद्द झाल्यानंतर त्वरित त्यांचे पैसे परत करण्यास सांगितले आहे. विमान कंपनीने तिकिटांचे पैसे परत करण्याबाबतही बोलले आहे. परतावा मूळ पेमेंट मोडद्वारे केला जाईल. म्हणजे, ज्यांनी तिकिटासाठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरले आहेत, त्यांच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये परतावा दिसून येईल. दुसरीकडे, ज्यांनी UPI आणि नेट बँकिंगद्वारे पैसे भरले आहेत त्यांना थेट त्यांच्या खात्यात परतावा मिळेल.

अंतरिम स्थगितीसाठी विमान कंपनीची मागणी
NCLTने गुरुवारी अंतरिम स्थगितीवरील आपला आदेश राखून ठेवला होता. एनसीएलटीने सांगितले की, दिवाळखोरी संहिता म्हणजेच IBC अंतर्गत अशी कोणतीही तरतूद नाही. ज्या कंपन्यांनी GoFirst ला विमान भाड्याने दिले होते त्यांनी NCLT ला सांगितले की, त्यांनी एअरलाइनच्या अंतरिम स्थगितीच्या मागणीवर आक्षेप घेतला. स्थगितीचे गंभीर परिणाम होतील.

इंधन पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि खाजगी विमानतळ चालकांनी कंपनीला दिलेले कोणतेही निर्गमन आणि पार्किंग स्लॉट रद्द करू नयेत अशी एअरलाइनची इच्छा आहे. याशिवाय इंधन पुरवठादारांनी फ्लाइट ऑपरेशनसाठी इंधनाचा पुरवठा सुरू ठेवावा आणि कोणतेही विद्यमान करार रद्द करू नये.