आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार्ट अप्स:व्यवसायाच्या प्रारंभासाठी कर्ज हवेय? तर घ्या या सरकारी योजनांचा लाभ

5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आंत्रप्रेन्युअर्सला भासणारा निधीचा तुटवडा या योजनांमुळे होणार दूर

आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यात सध्याच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्यासाठीच नव्हे तर नवे उद्योग सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. एमएमई क्षेत्राचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) एकूण ४० % योगदान आहे. तसेच यातून अनेक रोजगारही निर्माण होताे. अशावेळी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी याची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळेच सरकारकडूनही या क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच तरुणांनाही यातून अनेक संधी मिळणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार, ८३ टक्के भारतीय युवकांचा नवीन उद्योग सुरू करण्याकडे कल आहे. तुम्हालाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास या सरकारी योजनांची मदत घेऊ शकतात. जाणून घ्या अशाच काही सरकारी योजनांबाबत-

सिडबी मेक इन इंडिया सॉफ्ट लोन

 • कर्जाची रक्कम : या योजनेंतर्गत किमान २५ लाखांचे कर्ज मिळते.
 • पात्रता : उद्योग आधार मेमोरंडम (यूएएम) नंबर असणारे एमएसएमई यासाठी अर्ज करू शकतात.
 • कसे घ्यावे : हे कर्ज सिडबीकडून घेता येते. ही सरकारकडून साहाय्य मिळणारी आर्थिक विकास संस्था आहे.
 • ऑनलाइन प्रक्रिया : कर्ज मिळवण्यासाठी या वेबसाइटवर अर्ज करू शकतात - www.sidbi.in
 • सविस्तर समजून घ्या : नवीन शाखेची स्थापना किंवा सध्याच्या विकासासाठी एमएसएमईला सॉफ्ट लोन दिले जाते. हे क्वासी इक्विटी किंवा टर्म लोनच्या रूपात मेक इन इंडियांतर्गत २५ क्षेत्रांशी संबंधित युनिट्सला देता येईल. दुसऱ्या क्षेत्रातील युनिट्सलाही कर्ज देता येऊ शकते. या योजनेंतर्गत मिळालेल्या रक्कमेचा उपयोग आधीचे कर्ज फेडण्यासाठी करता येत नाही.

क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम

 • कर्जाची रक्कम : मायक्रो व स्मॉल एंटरप्रायझेसला फंड व नॉन फंड आधारित २ कोटींपर्यंत कर्ज दिले जाते.
 • पात्रता : मॅन्युफॅक्चरिंग व सर्व्हिस अॅक्टिव्हिटी ( शिक्षण संस्था, कृषी, स्वयं साहाय्यता समूह व प्रशिक्षण संस्था वगळता) क्षेत्रातील एमएसई यासाठी पात्र आहेत.
 • कसे घ्यावे : शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व नाबार्डने सस्टेनेबर व्हायबल श्रेणीत ठेवलेल्या निवडक ग्रामीण बँकांमध्ये कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. स्थानिक पातळीवर या बॅकांमध्ये कर्ज मिळेल.
 • ऑनलाइन प्रक्रिया : या वेबसाइटवर ऑनलाइन करता येईल- www.cgtmse.in
 • सविस्तर समजून घ्या : या योजनेंतर्गत १ कोटींपर्यंतचे टर्म लोन किंवा वर्किंग कॅपिटल सुविधेद्वारे हे कर्ज मिळू शकते. योजनेंतर्गत जवळपास ८५ टक्के रकमेवर गॅरंटी कव्हर उपलब्ध आहे.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser