आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Need To Verify The Basis For Hiring A Tenant Or Employer; Not All Aadhaar Numbers Are 12 Digits UIDAI

UIDAI चा इशारा:भाडेकरु किंवा नोकरीवर ठेवण्यासाठी आधार व्हेरिफाय करणे गरजेचे; सगळ्यांचे आधार नंबर 12 आकड्याचे नसतात - UIDAI

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एम आधार अ‍ॅपद्वारे करता येईल व्हेरिफिकेशन्स

भारतात आधार कार्डला खूप महत्व आहे. आधार हे आयडी पुरावा असून यामुळे असंख्य कामे होतात. परंतु आधार कार्डशी संबंधित सेवा पाहणाऱ्या यूआयडीएआयचे (UIDAI) म्हणणे आहे की, प्रत्येक 12 अंकी नंबर आधार नसतो. त्याकरीता युआयडीआयए आधार नंबर व्हेरिफाय करण्याची सुविधा पुरवतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. महत्वाचे म्हणजे एखाद्याला भाडेकरु किंवा नोकरीवर ठेवण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन्स करणे गरजेचे आहे.

आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया

 • सर्वप्रथम www.uidai.gov.in वर जा.
 • ‘My Aadhaar’ मध्ये गेल्यावर 'आधार सर्व्हिसेस' विभागात जावून ‘व्हेरिफाई आधार नंबर’ वर क्लिक करा.
 • आता नव्याने उघडलेल्या पानावर तुमचा आधार नंबर आणि तेथे असलेला सुरक्षा कोड टाका आणि ‘व्हेरिफाई’ वर क्लिक करा.
 • यानंतर, तुम्ही टाकलेला 12 अंकी क्रमांक आधार नसेल आणि तो डिअॅक्टिव्हेट होत नसेल तर तुम्हाला त्या संकेतस्थळावर आपल्या आधारचे स्टेटस दिसेल.
 • यामुळे आपल्या जवळ जो आधार आहे तो आधार आहे की नाही? हे कळेल.

एम आधार अ‍ॅपद्वारे करता येईल व्हेरिफिकेशन्स

 • आधार कार्डमध्ये एक क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड असतो ज्याचा उपयोग व्हेरिफिकेशन्साठी केला जातो.
 • यासाठी आपल्या मोबाईल अ‍ॅप mAadhaar मध्ये “क्यूआर कोड स्कॅनर” उघडा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.
 • यानंतर आधार कार्डधारकाची माहिती स्क्रीनवर दर्शवली जाईल.

UIDAI च्या संकेतस्थळावर मिळते सत्य माहिती
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भाडेकरु किंवा नोकरीवर ठेवत असाल तर त्याचे आधार नंबर व्हेरिफाय करणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचे आधार खरे आहे की खोटे हे कळणार आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करुन दिशाभूल केली जाते. त्यामुळे त्या आधारी संपूर्ण आणि सत्य माहिती यूआयडीआयएच्या संकेतस्थळावर मिळू शकते. जेणेकरुन आपलीही दिशाभूल होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...