आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटफ्लिक्सचा प्रयोग:नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना बसू शकतो झटका, पासवर्ड शेअरिंगसाठी मोजावे लागतील पैसे!

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना पासवर्ड शेअरिंग करणे महागात पडू शकते. तुम्ही जर इतरांना पासवर्ड शेअर करीत असाल तर तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. अशा लोकांना नेटफ्लिक्सचा वापर सुरू ठेवण्यासाठी कंपनी अतिरिक्त शुल्क भरण्यास सांगु शकते तसा प्रयोग कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहे.

नेटफ्लिक्सचा पासवर्ड युजर्स कुटुंबियांसह तसेच बाहेरील सदस्यांसोबत शेअर करीत आहेत. अशा वापरकर्त्यांसाठी हा मोठा झटका असेल.

चेंगहाई लाँग, कंपनीचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर म्हणाले की, पासवर्ड घरबसल्या शेअर केल्याने आमच्या गुंतवणुकीच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.

या देशांमध्ये चाचणीची तयारी

नेटफ्लिक्स सध्या चाचणी कालावधीत चिली, कोस्टारिका आणि पेरू या तीन देशांमध्ये ही पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. येथे या प्रयोगादरम्यान, नेटफ्लिक्स नवीन खाती किंवा इतर डिव्हाइसेसवरील प्राथमिक खात्यांमध्ये प्रोफाइल लॉग इन करण्याची क्षमता तसेच सवलतीच्या दरात त्यांच्या पॅकेजमध्ये अधिक दर्शक जोडण्याचा पर्याय ऑफर करेल. चाचणी केल्यानंतरच कंपनी या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलेल. सध्या कंपनी फक्त याच देशांमध्ये या योजनेवर काम करेल.

सध्याचे हे आहेत नियम

सध्या जर एखाद्या व्यक्तीचे नेटफ्लिक्सचे सदस्यत्व असेल, तर तो त्याचे वापरकर्ता नाव-पासवर्ड इतर कोणाशीही शेअर करू शकतो. याच्या मदतीने दुसरी व्यक्ती नेटफ्लिक्सचा मोफत आनंद घेऊ शकते. तथापि, तुम्ही एका वेळी तुमच्या नेटफ्लिक्स पॅकेजनुसार निश्चित केलेल्या डिव्हाइसपेक्षा जास्त डिव्हाइसवर नेटफ्लिक्सचा आनंद घेऊ शकत नाही.

स्पर्धेमुळे केले होते कंपनीने ६० टक्के दर कमी

कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये आपल्या योजनांच्या किमती 60 टक्क्यांपर्यंत कमी केल्या होत्या. भारतातील अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने व हॉटस्टारशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

मिडिया पार्टनर आशीया (एमपीए) च्या अंदाजानुसार, जगभरातील सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांच्या बाबतीत नेटफ्लिक्स खूप मागे आहे. 2021 च्या अखेरीस नेटफ्लिक्सला 5. 5 दशलक्ष वापरकर्ते मिळण्याची अपेक्षा आहे. जे हॉटस्टारशी डिस्ने (46 दशलक्ष) आणि अॅमेझॉन प्राईम (20 दशलक्ष) पेक्षा खूपच कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...