आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maruti Alto चे नवीन मॉडेल:ऑगस्टपर्यंत बाजारात येण्याची शक्यता, चाचणीतून दिसली नवीन झलक, सीएनजीतही असेल उपलब्ध

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारूतीने भारतात ग्रॅंड विटाराच्या लॉन्चनंतर आता कंपनीने आता सर्वात जास्त विक्री होणारी अल्टोच्या नवीन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये कारचे नवीन मॉडेल सादर केले जाऊ शकते. 2000 साली लॉन्च झालेली मारूतीची अल्टो काही वर्षातच देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. 20 वर्षात कंपनीने 40 लाखाहून अधिक अल्टो कार विकल्या आहेत. मात्र, त्यानंतर तिची विक्री कमी होऊ लागली, मात्र आता पुन्हा एकदा ही कार नव्या अवतारात (मॉडेल) बाजारात दाखल होणार आहे.

कंपनीकडून चाचणी सुरू
मारुतीने नवीन अल्टोची चाचणी सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचे प्रदर्शन लीक झालेल्या चित्रामध्ये चाचणीदरम्यान दिसली आहे. इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत अनेक बदल पाहायला मिळतात.

जुन्या कारपेक्षा असेल वेगळी

या नवीन कारच्या अहवालानुसार, अल्टोचा आगामी काळात येणार नवीन प्रकार जुन्या मॉडेलपेक्षा वेगळा असेल. त्याला नवा प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन देण्याची चर्चाही रंगली आहे. ही कार मॉड्युलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. अन्य कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये लॉन्च केलेल्या कार्सला टक्कर देण्यासाठी कंपनी आपल्या डिझाईनमध्येही मोठा बदल करणार आहे.

दोन इंजिनचा असेल पर्याय
अल्टोचे दोन प्रकार आधीच सादर करण्यात आलेले आहे. तर नवीन प्रकार तिसऱ्या पिढीचे मॉडेल असणार आहे. यामध्ये नवीन K10C 1.0 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 89 Nm चा पीक टॉर्क आणि 67 hp पॉवर देते. कंपनी नवीन अल्टो दोन इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करण्याचा विचार करीत आहेत.

सीएनजी प्रकारात देखील असेल

अल्टोच्या थर्ड जनरेशन मॉडेलबाबत बोलायचे झाले, तर हेडलॅम्प आणि फॉग लॅम्पमध्ये बदल पाहिले जाऊ शकतात. याशिवाय मेश ग्रिलचा फ्रंट बंपर देखील बदलता येतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकी सीएनजी प्रकारात नवीन अल्टो लॉन्च करू शकते, असे अहवालातून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...